सिंधुदुर्गात मुसळधार...! रस्त्यावर पाणी येऊन वाहतूक विस्कळीत

शिवप्रसाद देसाई
मंगळवार, 18 जुलै 2017

जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत तालुकावार झालेला व कंसात आतापर्यंतचा सरासरी पाऊस असा : दोडामार्ग 29 (1661), सावंतवाडी 37 (1653.8), वेंगुर्ले 22 (1349.53), कुडाळ 43 (1368), मालवण 17 (1150.4), कणकवली 39 (1798), देवगड 28 (1108), वैभववाडी 68 (1414). जिल्ह्याची एकूण सरासरी 35.37 (1437.83).

सावंतवाडी : सिंधुदुर्गात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. संततधारेमुळे जिल्हाभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन वाहतूक विस्कळीत झाल्याचे प्रकारही घडले.

जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर वाढला आहे. मात्र हा पाऊस अधून-मधून विश्रांती घेवून कोसळत होता. आज सकाळी दहाच्या दरम्यान पावसाचा जोर अचानक वाढला. उशिरापर्यंत संततधार सुरूच होती.

यामुळे ठिकठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. सावंतवाडी, फोंडा, कणकवली, कुडाळ आदी शहरात गटार तुंबून पाणी रस्त्यावर येण्याचे प्रकार घडले. जिल्ह्याभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणत्याही मोठ्या हानीची नोंद नसली तरी अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाल्याचे प्रकार घडले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :