माडखोल धरणाजवळ केरळच्या धरतीवर ‘होम स्टे’ प्रकल्प

माडखोल धरणाजवळ केरळच्या धरतीवर ‘होम स्टे’ प्रकल्प

सावंतवाडी - केरळ येथील अलेप्पीच्या धर्तीवर माडखोल धरणाच्या परिससरात ‘होम स्टे’ प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथील पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत यांनी राजकारण आणि आपला अन्य व्यवसाय बाजूला ठेवून हा प्रकल्प उभा केला आहे.

याठिकाणी आलेल्या पर्यटकांना धरणात मच्छीमारी करण्याबरोबर ग्रामीण पर्यटनाचा आनंद मिळेल, या दृष्टीने आपण हा प्रकल्प सुरू केला असल्याचे श्री. सावंत यांचे म्हणणे आहे.

कुणकेरी येथील सावंत यांनी आपल्या घराच्या बाजूला आणि माडखोल धरणाला लागून असलेल्या आपल्या बागायतीचे रूपांतर होम स्टे प्रकल्पात केले आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी दोन केरळमधील अलेप्पीच्या धर्तीवर अगदी धरणातील पाण्याच्या बाजूला खोल्या उभारण्यात आल्या आहेत.

त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याचा आनंद घेण्यात येणार आहे. दुसरीकडे त्यांनी आपल्या बागेत मसाल्याच्या पिकासह आंबा, काजू, चिकू आदी कोकणातील पिके घेतली आहे. तसेच विविध फुलझाडांची लागवड केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकाना मौजमजेसोबत विविध माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

सावंत यांचे घराणे तसे शिक्षकी पेशातले आहे; मात्र या सर्व गोष्टींना फाटा फोडत त्यांनी क्वारी व्यवसायाबरोबर राजकारणात आणि समाजकारणात जम बसविला होता; मात्र आपल्या घराला लागुन असलेल्या माडखोल धरणाचा पर्यटनदृष्टया विकास व्हावा हा विचार त्यांच्या मनात गेले अनेक दिवस होता. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

बोटींगसाठी प्रस्ताव
यावेळी सावंत म्हणाले, ‘‘धरणात बोटींग चालू शकते. तशी पालकमंत्री दीपक केसरकर यांची संकल्पना होती. त्यांनी अनेकवेळा आपल्याशी ती बोलून दाखविली होती. त्यामुळे धरणात बोटींग करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी आपण जिल्हास्तरावर प्रयत्न करणार आहे.’’

धरणाच्या बाजूला आमची बागायती असल्यामुळे अनेक कंपन्या तसेच राजकीय लोकांनी त्याठिकाणी हॉटेल उभारण्यासाठी जागा मागितली होती; मात्र स्थानिकांना रोजगार देण्यासाठी मला काही तरी करायचे होते. पैसा कमविणे हा उद्देश नाही. बाजूला असलेल्या धरणाचा फायदा घेऊन परिसरातील लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रमोद सावंत, 
माजी सभापती, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com