मधमाश्‍यांच्या हल्ल्यात वेंगुर्लेत सात जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

वेंगुर्ले - आनंदवाडी येथे मधमाश्‍यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात येथील माजी पोलिस पाटील विश्राम सोमा जाधव यांसह सात जण जखमी झाले.

वेंगुर्ले - आनंदवाडी येथे मधमाश्‍यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात येथील माजी पोलिस पाटील विश्राम सोमा जाधव यांसह सात जण जखमी झाले.

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मधमाश्‍यांच्या हल्ल्यातून बालबाल बचावलेल्या विश्राम जाधव यांना उपचारासाठी तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
आनंदवाडी भराडी रोड येथून माजी पोलिसपाटील विश्राम जाधव हे घरी जात होते. या वेळी त्यांच्यावर मधमाश्‍यांनी अचानक हल्ला केला.

या वेळी मधमाश्‍यांच्या हल्ल्यातून त्यांना सोडविण्यासाठी येथील रहिवासी विकास जाधव, प्रवीण जाधव, राजन कांबळे, नितिन जाधव, विठ्ठल जाधव, प्रेमानंद जाधव, प्रभावती जाधव यांनी मदतीसाठी धाव घेतली. घरातील चादरी आणून जाधव यांना त्यात  लपेटुन त्यांची मधमाश्‍यांपासून सुटका केली. या वेळी मदतीसाठी आलेल्यांवरही मधमाश्‍यांनी किरकोळ हल्ला केला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला; मात्र विश्राम जाधव यांच्यावर मधमाश्‍यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढविल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.