आंबोलीतील महादेव भिसेंच्या छायाचित्रास आंतरराष्ट्रीय पुरस्कार

आंबोलीतील महादेव भिसेंच्या छायाचित्रास आंतरराष्ट्रीय पुरस्कार

सावंतवाडी - आशिया खंडातील पाच हजारांहूनही अधिक छायाचित्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आंबोलीतील प्राणी अभ्यासक तथा वन्यप्राणी छायाचित्रकार महादेव ऊर्फ काका भिसे यांनी क्‍लिक केलेला फोटो अव्वल ठरला. त्यांनी काढलेल्या बेडकाच्या फोटोने त्यांना हा बहुमान मिळवून दिला. 

निसर्गातली कला कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपत महादेवने आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्गाचं नाव कोरलंय. ‘सेंच्युरी एशिया’ या अत्यंत प्रथितयश मासिकातर्फे आयोजित ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ स्पर्धेत या विभागातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकाराचं पारितोषिक पटकावले आहे. नुकत्याच द रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

रोख रक्कम, एक कॅमेरा बॅग, प्रमाणपत्र आणि भारतातील कोणत्याही नॅशनल पार्कमध्ये सफारी हे या पुरस्काराच स्वरूप आहे. आशिया खंडातील पाच हजाराहूनही अधिक छायाचित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता आणि काका भिसे हा त्या सगळ्यात अव्वल ठरला आहे. सेंच्युरी एशिया या मासिकामध्ये त्याचा हा फोटो प्रकाशित देखील करण्यात आला आहे.

आंबोली बुश या बेडकाला एका किटकांच्या लारवयांनी पकडलेले असल्याचा हा फोटो असून हा कीटकांचा लारवा या बेडकांना भविष्यात या बेडकांची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. असा शोधनिबंधही यावर लिहिण्यात आला. हा शोधनिबंध व काका भिसे यांनी काढलेला तो बेडकाचा फोटो या दोघांनाही मिळवून हा मानाचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक काका भिसे यांना मिळाले. 

काका भिसे हे गेली चौदा वर्षे आंबोलीच्या निसर्ग संवर्धनासाठी झटत असून गेली तीन वर्षे ते वन्यप्राणी छायाचित्रणही करत आहेत. कोणत्याही वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी हा पुरस्कार मिळवण स्वप्नवत असत. या छायाचित्राच्या शोधनिबंधात त्यांना अनिश परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या पुरस्कारामुळे त्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

गेल्या चौदा वर्षांत आपण अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छायाचित्रकारांबरोबर फिरून हा छंद जोपासला आहे. एवढ्या मोठ्या स्तरावर मिळालेल्या या यशामुळे मला अत्यानंद झाला आहे आणि अधिक चांगले फोटो काढण्याची उर्मी निर्माण झाली आहे.
- महादेव भिसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com