कोकण रेल्वेमार्गावर जादा गाडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

कणकवली -  कोकण रेल्वेमार्गावर दिवाळीत १७ ते २५ ऑक्‍टोबरदरम्यान मुंबई सीएसटी ते कोचिवली या मार्गावर जादा गाडी धावणार आहे.

कणकवली -  कोकण रेल्वेमार्गावर दिवाळीत १७ ते २५ ऑक्‍टोबरदरम्यान मुंबई सीएसटी ते कोचिवली या मार्गावर जादा गाडी धावणार आहे.

गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, करमळी, मडगाव तसेच कारवार, कुमटा, भटकल, उडपी, एर्नाकुलम ते कोचिवली येथे थांबे देण्यात आले आहेत. 

ही गाडी सीएसटी येथून १७ आणि २४ ऑक्‍टोबरला (०१०७९) सीएसटी येथून रात्री १२.२० वाजता सुटणार असून कोचिवलीला सकाळी ९ः०० वाजता पोचणार आहे. कोचिवली येथून १८ आणि २५ ऑक्‍टोबरला (०१०८०) कोचिवली येथून दुपारी १२ वाजता सुटून सीएसटीला दुसऱ्या दिवशी रात्री १०.१५ वाजता मुंबईला पोचणार आहे. ही गाडी १६ डब्याची असून १४ स्लीपर कोच तर दोन सर्वसामान्य बोगी असणार आहेत.