वराडला आता प्रतिक्षा आयर्लंडच्या पंतप्रधानांची !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

लिओ वराडकारांच्या निवडीने वराड गाव जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. त्यामुळे गावात जल्लोष साजरा केला जात आहे. लिओ यांचे वडील प्रकाश वराडकर यांनी आपला मुलगा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना येथे मूळगावी आणण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यामुळे वराड वासियांना लिओंच्या आगमनाची प्रतिक्षा आहे.

मालवण : लिओ अशोक वराडकर यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांचे मूळगावी वराड येथे आंनदोत्सव साजरा करण्यात आला. वराड गाव त्यांनी जगाच्या नकाशावर नेले आहे. त्यामुळे वराडवासियांना आता लिओंच्या आगमनाची प्रतिक्षा आहे.

लिओ अशोक वराडकर आयर्लंड पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. त्यांना निवडणूकीत प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यानुसार काल (ता. 2) लिओ यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत वराडकर यांनी निकटचे प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला. शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते वराडकर यांना मिळाली.

वराडकर आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे वृत्त प्रसार वाहिन्या आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या वराड येथील मुळ गावी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  

त्यांच्या निवडीने वराड गाव आज जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. त्यामुळे गावात जल्लोष साजरा केला जात आहे. लिओ यांचे वडील प्रकाश वराडकर यांनी आपला मुलगा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना येथे मूळगावी आणण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यामुळे वराड वासियांना लिओंच्या आगमनाची प्रतिक्षा आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल