मालवणी बोली साहित्य संमेलन १३ मे रोजी - लळीत

मालवणी बोली साहित्य संमेलन १३ मे रोजी - लळीत

कणकवली - मालवणी बोली आणि साहित्य संशोधन केंद्राचे पाचवे अनियतकालीक मालवणी बोली साहित्य संमेलन १३ मे रोजी येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान येथे होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद माजी आमदार प्रमोद जठार, अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांची निवड झाली आहे. उद्‌घाटक म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाचे प्रायोजकत्व सिंधुभूमी कला अकादमीने स्वीकारले आहे, अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी येथे दिली. या वेळी अकादमीचे अध्यक्ष जठार, केंद्राचे कार्यवाह सतीश लळीत व अकादमीचे कार्यवाह मधुसूदन नानिवडेकर उपस्थित होते.

मालवणी लघुपट स्पर्धा 
मालवणी कवी संमेलनापूर्वी १२ मे रोजी जिल्ह्यातील मालवणी तरुणांनी तयार केलेल्या मालवणी भाषेतील लघुपटाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जास्तीत जास्त २५ मिनिटापर्यंत लघुपट सादर करता येणार असून, याचे परीक्षण गाव गाता गजाली या मालिकेतील कलाकार करणार आहेत. 

डॉ. लळीत म्हणाले,‘‘यावर्षी संमेलन आयोजित करण्याची कल्पना सिंधुभूमी कला अकादमीचे अध्यक्ष जठार यांच्याकडे मांडताच त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत संमेलनाचे प्रायोजकत्व स्वीकारले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याची केंद्राची विनंतीही त्यांनी मान्य केली.’’ 

केंद्राचे कार्यवाह सचिन लळीत म्हणाले,‘‘संमेलन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. संमेलन सहा सत्रात होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळूसकर उपस्थित राहणार आहेत. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेले प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी संमेलनाचे उद्‌घाटक म्हणून उपस्थित असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com