गोमेकॉ आरोग्य सेवा निशुल्कसाठी रास्तारोकोचा इशारा

गोमेकॉ आरोग्य सेवा निशुल्कसाठी रास्तारोकोचा इशारा

सावंतवाडी - गोमेकॉतील आरोग्य सेवा निशुल्क देण्याबाबत महाराष्ट्र व गोवा मुख्यमंत्र्यांनी येत्या पंधरा दिवसात सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा बांदा येथे रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी येथे केला. 

गोव्याला लागणारी वीज आणि पाणी महाराष्ट्राने दिले, मग आरोग्य सेवेबाबत सिधुदूर्ग जिल्ह्यावर अन्याय का असा सवाल यावेळी श्री तळवणेकर यांनी विचारला आहे. ते येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

श्री तळवणेकर म्हणाले, गोवा बांबूळी येथील शासकीय महाविद्यालयाला परवानगी देताना तत्कालीन परिस्थितीत लोकसंख्या कमी पडत होती. त्यावेळी अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या विचारात घेवून त्या महाविद्यालयाला परवागनी दिली होती, मात्र आजचे गोव्याचे मंत्री हा इतिहास विसरले आहेत, असे आपल्याला दुदैवाने म्हणावेसे वाटते

श्री तळवणेकर पुढे म्हणाले, सिधुदूर्ग जिल्ह्याकडुन गोव्याला तिलारीच्या माध्यमातून पाणी दिले जाते. महाराष्ट्राकडुन वीज दिली जाते, असे असताना सिधुदूर्ग जिल्ह्याच्या जनतेला आरोग्य सेवेसाठी पैसे मोजणे चुकीचे आहे. कालपासुन सुरू करण्यात आलेल्या शुल्काच्या यादीत दिवसाला पन्नास रुपये बेड चार्ज आकारण्यात आला आहे. इतिहासात देशातील पहिल्याच रुग्णालयात अशा प्रकारे शुल्क आकारण्यात आले आहे, हा सर्व प्रकार चुकीचा आहे. याबाबत योग्य ते नियोजन होणे गरजेचे आहे, तशी मागणी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. तसेच येत्या दहा दिवसात यावर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा बांदा येथे रास्तारोको करुन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. तळवणेकर यांनी  दिला. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पुढील आंदोलन 
यावेळी तळवणेकर म्हणाले चार तारखेला ओरोस येथे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस येणार आहेत. आम्ही जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन ही बाब सांगणार आहोत. तसेच तात्काळ याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशी मागणी करणार आहोत. चर्चेदरम्यान दोन्ही राज्याकडुन सकारात्मक भूमिका अपेक्षीत आहे. अन्यथा आंदोलनांचा मार्ग मोकळा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com