निपाह रुग्ण गोव्यात आढळल्याने सिंधुदुर्गात सतर्कतेचा इशारा

तुषार सावंत
सोमवार, 28 मे 2018

कणकवली -  गोवा राज्यात निपाहचा संशयित रुग्ण सापडला आहे. तो केरळ येथून गोवा येथे रेल्वेने आला आहे. हा प्रवासी निपाहचा संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर  सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सर्तकतेचा इशारा दिला आहे.

कणकवली -  गोवा राज्यात निपाहचा संशयित रुग्ण सापडला आहे. तो केरळ येथून गोवा येथे रेल्वेने आला आहे. हा प्रवासी निपाहचा संशयीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर  सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दक्षिणणेतून येणारे व जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणे गरजेची आहे. जिल्हयात आतापर्यंत लेप्टोपायरसिस,  डेंगी, माकड ताप अशा विविध विषाणू जन्य आजाराचा अनुभव असल्याने निपाहपासून सावधनतेचा इशारा देण्यात येत आहे 

आरोग्य अधिकारीची उद्या तातडीची बैठक  - डॉ. योगेश साळे
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची उद्या ओरोसला बैठक होणार असून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांनी दिली  वटवाघळे अधिवास आहे तेथे तपासणी केली जाणार आहे. वटवाघळांचा आदिवास असलेल्या ठिकाणी तपासणी करून वटवाघळांची सॅम्पल तपासणीसाठी एनआयव्हीला पाठविणार असल्याचेही डाॅ. साळे यांनी सांगितले.  

Web Title: Sindhudurg News Nipah Virus in Goa