अश्‍लील चित्रफीत व्हायरल झाल्याने खळबळ

अश्‍लील चित्रफीत व्हायरल झाल्याने खळबळ

सावंतवाडी - तालुक्‍यातील शहराच्या बाजूला असलेल्या गावातील महिलेची अश्‍लील चित्रफीत व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून आपल्याला धमकी देऊन हा प्रकार करवून घेतल्याचे तिचे म्हणणे आहे.

तिने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, पोलिस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार महिला सहाय्यता केंद्राकडून चौकशी सुरू असून येत्या दोन दिवसांत गुन्हा दाखल होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्‍यातील एका गावात संबंधित महिला राहते. तिचा पती जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयात कार्यरत आहे. त्या महिलेशी संबंधित तरुणाने ओळख करून मैत्री वाढविली आणि त्याचाच फायदा घेऊन तिच्याकडून हा प्रकार करून घेतल्याची चर्चा आहे. संबंधित युवक हा एका एजन्सीवर चालक म्हणून काम करीत आहे. 
त्याने आपल्या ओळखीचा फायदा घेऊन व धमकावून क्‍लिप काढल्याचे व नंतर त्यात फोटोशॉपमध्ये अश्‍लील बदल केल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे. आपल्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केला असेल, असे संबंधित महिलेचे म्हणणे आहे.

सध्या गावातील काही तरुणांच्या मोबाईलमध्ये ही क्‍लीप फिरत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिला आज आपल्या पतीसह येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आली होती. यावेळी त्या दोघांनी पोलिसांशी चर्चा केली.

याबाबत येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील धनावडे यांच्याशी संपर्क साधला असता एक जोडपे अशी तक्रार घेऊन आले होते; मात्र अशा घटनांचा तपास किंवा चौकशी विशेष महिला अधिकारी नेमून केला जातो. त्यामुळे त्यांना महिला सहाय्यता केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. त्यानंतर पुढील भूमिका घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात संबंधित तक्रार दाखल होण्याची शक्‍यता आहे असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com