खाणीत दगड कोसळून कामगार ठार

हेदूळ ः येथे काळ्या दगडाच्या खाणीत डोंगराचा तुटलेला भाग.
हेदूळ ः येथे काळ्या दगडाच्या खाणीत डोंगराचा तुटलेला भाग.

मालवण - हेदूळ येथे काळ्या दगडाच्या खाणीत काम करताना डोंगरावरील मातीचा काही भाग कोसळून मोठा दगड अंगावर पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. इराण्णा अमरप्पा चव्हाण (वय ५०, मूळ रा. कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. ही दुर्घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. 

तालुक्‍यातील हेदूळ येथे आज सकाळी नऊच्या दरम्यान इराण्णा चव्हाण आपल्या दोन अन्य कामगारांसह भरावाची माती बाजूला करत होता. या वेळी त्यांच्यासमवेत डंपर चालक नामदेव परब हे उपस्थित होते. माती भरण्याचे काम सुरू झाल्यानंतर काही वेळात अचानक उंच डोंगरावरील एक मोठा दगड गडगडत 
खाली आला. हा दगड इराण्णा चव्हाणच्या अंगावर कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. कामगारांनी त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत डंपर चालक नामदेव परब याने कट्टा पोलिस दूरक्षेत्रास व खाणमालक अमरसेन सावंत यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे उत्तम आंबेरकर, योगेश तांबे, योगेश सराफदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. इराण्णा चव्हाण हा विवाहित असून त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी कर्नाटकहून इराण्णा याचे नातेवाईक आल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. विमा रक्कम त्याबरोबर रोख स्वरूपात नातेवाईकांना मदत केली जाणार असल्याचे खाण चालक सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com