प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्तींची वाहतूकच रोखण्याची मुर्तीकार संघटनेच्या बैठकीत मागणी

प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्तींची वाहतूकच रोखण्याची मुर्तीकार संघटनेच्या बैठकीत मागणी

मालवण - मातीच्या गणेश मूर्ती  तयार करणाऱ्या मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार एकवटले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्ती आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात बैठकीत घेण्यात आला. 

तालुक्‍यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल सभागृहात श्री गणेश मूर्तिकार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गजानन तोंडवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नारायण सावंत, सतीश कांबळी, दिलीप वेंगुर्लेकर, राधाकृष्ण नाईक, नीलेश हडकर, बाळ वाईरकर, सुषमा मयेकर, दिलीप वायंगणकर, अरुण पालकर, गुरुनाथ नांदोडकर यांच्यासह जिल्ह्यातील मूर्तिकार उपस्थित होते. 

बैठकीत प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत सविस्तर चर्चा झाली. मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी माती भरपूर प्रमाणात मिळते. बाजारात शाडू मातीसुद्धा मुबलक प्रमाणात मिळते असे असताना पीओपीच्या मुर्त्या बनविणे चुकीचे आहे. पेण, पनवेल, कोल्हापूर येथून या मुर्त्या आणून जिल्ह्यात विकल्या जातात. आंबे मुंबईला घेऊन जाणाऱ्या वाहनातून येताना कमी भाडे आकारून मूर्ती आणल्या जातात. 

प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्ती खरेदीसाठी कमिशन एजंट भरपूर नफा मिळवतात. यामुळे मातीच्या मुर्त्या बनविण्याऱ्या मूर्तिकारांवर बेरोजगारी कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने जिल्ह्याच्या सीमेवरच प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तींची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com