राजापुरातून २०१९ ला राजन साळवीच उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

राजापूर - राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचा २०१९ चा विधानसभा उमेदवार हे विद्यमान आमदार राजन साळवीच राहतील, अशी घोषणा शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ओणी येथे झालेल्या प्रचार सभेत केली. सभेला ५०० हून अधिक शिवसैनिक उपस्थित होते. 

मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओणी ग्रामपंचायत सदस्या अस्मिता नरेश चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नरेश चव्हाण, जितेंद्र वेताळे, चंद्रकांत जड्यार, शंकर मालप, शेखर कुलकर्णी, भूषण सुर्वे, दीपक शिंदे, प्रकाश लोळगे, सुवर्णा जडयार, प्रशांत लोकरे उपस्थित होते. 

खासदार राऊत म्हणाले, ‘‘शिवसेनाच जनतेचा विकास करु शकते. आमदार साळवी हे जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले शिवसैनिक आहेत. याच कार्यपद्धतीवर खुश होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील होणाऱ्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजन साळवी यांचेच नाव आहे.’’ खासदारांच्या घोषणेनंतर शिवसेना ओणी विभागातर्फे आमदार साळवी यांचा जाहीर सत्कार झाला. अडसर दूर झाला

गेले काही दिवस या मतदारसंघात विरोध पक्षातील युवा नेता शिवसेनेत दाखल होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्याचा प्रवेश साळवींच्या २०१९ च्या उमेदवारीसाठी बाधक ठरण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात होती; मात्र खासदार राऊत यांनी ओणीतील सभेत केलेल्या जाहीर वक्‍तव्यामुळे साळवी यांच्यापुढील अडसर दूर झाल्याची कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.