सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचे ‘ड्रोन’द्वारे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - ‘एस. एम. प्रोडक्‍शन’ने आता धार्मिक पर्यटनांची सुंदरता मांडण्याचा एक सुंदर प्रयत्न केला आहे. सिंधुदुर्गातील धार्मिक पर्यटन स्थळांचा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून मनाला सौंदर्यांमुळे भुरळ पाडणारे आकर्षक व्हिडिओ तयार करून ते एस. एम. फोटोग्राफी ॲंड व्हिडिओ अशी दिव्य कोकण नावाची वेब मालिका सादर केली आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना सातासमुद्रापार पोहोचवण्याचा त्याचा महत्त्वाचा मानस आहे.

साईनाथ जळवी व त्याच्या टीमने ही किमया केली आहे. सिंधुदुर्गातील धार्मिक स्थळांना आकाशातून पाहणे ते तेवढे हेलिकॉप्टर तसेच विमानाशिवाय शक्‍य नसते. ही आकाश वाहने ठराविक उंचीवरच उडत असल्याने सिंधुदुर्गातील धार्मिक पर्यटन स्थळांचे सौंदर्याचे दर्शन पाहणे कठीण होते; मात्र बदलत्या युगात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून वरून विहंगम दृश्‍य पाहणे शक्‍य झाले आहे. याच माध्यमातून अलीकडेच एस. एम प्रोडक्‍शनने सावंतवाडी शहराचीही बरीच विहंगम दृश्‍ये व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली होती. 

सुंदरवाडीची राजवाडा, मोती तलावाची व्हिडिओ तसेच छायाचित्रे टिपली होती. याला यू ट्यूब, फेसबुकवरही अपलोड केल्यावर सिंधुदुर्गवासीयांसोबत जगभरातून याला अनेक कमेंटस्‌ व लाईक्‍स मिळाले होते. याच प्रतिसादाच्या प्रेरणेतून आता सिंधुदुर्गातील अनेक धार्मिक पर्यटन स्थळांची एक आगळी वेगळी व्हिडिओ वेब मालिका प्रदर्शित करण्याचा त्यांनी मानस आखून त्याची नुकतीच सुरुवातही त्यांनी केली.

सुरुवातीसच त्यानी ४ धार्मिक स्थळांचे व्हिडिओ तसेच त्यांची छायाचित्रे अपलोड केली आहेत. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर साईनाथ जळवी व त्यांच्या टीमने एस. एम फोटोग्राफी व व्हिडिओची वेब मालिका अपलोड केली आहे. दिव्यकोकण या वेब मालिकाद्वारे ते कोकणातील काही निवडक धार्मिकस्थळांबाबत माहिती सादर करणार आहेत. दसऱ्याला सुरवात केलेल्या काही व्हीडीओमध्ये येथील श्री देव उपरलकर देवस्थान सोबत वेंगुर्ले-वेतोर येथील श्री देवी सातेरी, माडखोलमधील साईनाथमंदीर यांचा सामावेश आहे.  

\साईनाथ जळवी यांच्यासोबत या सादरीकरणात त्यांचे सहकारी निनाद माणकेश्‍वर, अर्पिता मठकर, संकेत पाटकर आणि समीर नाडकर्णी यांची त्यांना बरीच साथ मिळाली आहे.