आंबोलीत कुत्र्यांपासून बचाव करताना सांबराचे पिल्लू जखमी

आंबोलीत कुत्र्यांपासून बचाव करताना सांबराचे पिल्लू जखमी

आंबोली - येथील बाजारवाडीमध्ये दोन कुत्री सांबराच्या पिल्लाचा पाठलाख करीत होती. आपला जीव वाचवत बेभान पळणारे सांबराचे पिल्लू थेट एका हॉटेलमध्ये खिडकीची काच तोडून शिरले. पण या झटापटीत खिडकीची काच या सांबराच्या पिल्लाला लागली व ते जखमी झाले. 

कुत्र्यापासून पिल्लाची सुटका झाली, मात्र हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. ते जखमी पिल्लू रक्तबंबाळ झाले होते. हाॅटेल कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधाता साधत तातडीने वनविभागाला कळविले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पिल्लावर आैषध उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडून दिले.

गेल्या महिन्यापासून आंबोली परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास जाणवत असून सांबरांची शिकार करण्याचेही प्रमाण वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com