सावंतवाडीत कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

हिंमत असेल तर अटक करून दाखवा
शिवसैनिकांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्या ठिकाणाहून सर्व कार्यकर्ते पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात गेले. तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना स्थानबध्द होण्यास सांगितले.

सावंतवाडी : शिवसेनेच्या येथील तालुका शाखेच्या वतीने कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक शासनाचा निषेध असो, शिवसेनेचा विजय असो अशा घोषणा पदाधिकार्‍यांकडून देण्यात आल्या.
कर्नाटकमध्ये जय महाराष्ट्रला बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज येथील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. बेळगाव-राजापूर या कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून बस पाठविण्यात आली. 

यावेळी कर्नाटक सरकार विरोधी अनेक घोषणा देण्यात आल्या. तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख शब्बीर मणियार, युवा नेते विक्रांत सावंत, अजित सांगेलकर, समीर मामलेकर, तेजस परब, गुणाजी गावडे, प्रशांत कोठावळे, विश्‍वास घाग, दिपा पाटकर, अर्पणा कोठावळे, नगरसेविका दिपाली सावंत, भारती मोरे, नंदू गावडे, नाना पेडणेकर, उल्हास परब, चंद्रकांत कासार, बाळू गवस, योगेश जाधव, राजू शेटकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

हिंमत असेल तर अटक करून दाखवा
शिवसैनिकांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्या ठिकाणाहून सर्व कार्यकर्ते पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात गेले. तेथे दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना स्थानबध्द होण्यास सांगितले. यावरून कार्यकर्ते आणि पोलिस अधिकार्‍यांत वाद झाला. त्यानंतर पोलिसांना सहकार्य करण्याचे ठरले; मात्र त्या ठिकाणी आलेल्या नगरसेविका आनारोजीन लोबो यांनी आक्रमक भूमिका घेत ‘तुम्ही का पोलिस ठाण्यात जाता हिंम्मत असेल तर पोलिसांनी आम्हाला अटक करावी’ असा इशारा दिला. त्यामुळे सर्व कार्यकर्ते पोलिसांसोबत जाण्याचे सोडून अन्य एका बैठकीसाठी निघून गेले.