यंदा दुष्काळाच्या झळा तीव्रच

यंदा दुष्काळाच्या झळा तीव्रच

सावंतवाडी - टंचाईवर मात करण्यासाठी बंधारा बांधणीच्या उद्दिष्टाची पूर्तता अद्याप दूर आहे. आता नद्यांचे प्रवाह मंदावल्याने पुढच्या महिन्याभरात बंधारे उभारले तरी टंचाईच्या झळांची तीव्रता कमी होईल असे चित्र नाही.

गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस होऊनही बऱ्याच ठिकाणच्या वस्तीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. गेल्यावर्षी जरी जास्त पाऊस झाला असला तरी राज्यात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्गात होतो; मात्र टंचाईची झळ वाटेला येतेच. या समस्येवर मात करण्यासाठी २०१२ पासून जिल्हा परिषदेने वनराई व कच्चे बंधारे घालण्यास सुरवात केली. या योजनेअंतर्गत अनेक गावांत हजारोंनी बंधारे घालण्यात आले. पावसाचे पाणी साठविण्याचे जिल्ह्यात फारसे स्त्रोत नाही. दरम्यान आता मार्च महिना आल्यावरच पाणीटंचाईच्या झळा जिल्हावासीयांना सोसाव्या लागतात, अशी स्थिती आहे. मात्र यावर वनराई व कच्चे बंधाऱ्याशिवाय ठोस अशी पर्यायी उपाययोजना किंवा प्रकल्प शासनाच्या दृष्टीक्षेपात आतापर्यंत तरी नाही.

सद्य:स्थिती पाहता शासनाच्या पूर्वनियोजिततेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर उघड आहे. दरवर्षी उिद्दष्ट दिले जाते आणि ते पुर्ण करण्याची जबाबदारी पंचायत समिती कृषी विभाग यांच्यावर सोपविण्यात येते. जिल्हा परिषदेकडुन आदेशही देण्यात येतात. मात्र उद्दीष्टा प्रत वाटचाल मात्र शुन्य. गेल्यावर्षी उद्दीष्ट जरी पुर्ण झाले नसले तरी ७ हजार ५०० पैकी ५००० एवढे बंधारे पुर्ण करण्यात आले होते. डिसेंबर पर्यंत हे उद्दीष्ट पुर्ण करायचे असते मात्र बऱ्याच ठिकाणी जानेवारी पर्यंत बंधारे बांधण्याचे काम चालु असते असे असतानाही समानधानकारक उद्दीष्टपुर्ती होत नाही. बंधारा बांधणीसाठी डेडलाईनला अवघा १ महिना बाकी असताना निम्याच्या जवळपास पोचले असून उद्दीष्टपुर्तता दुर आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळा यंदाही जिल्हावासियांच्या वाटेला असल्याचे समजते. देवगड, वैभववाडी मधील बराच भागात पाणी टंचाई असते तर मालवण वेंगुर्ले या तालुक्‍यातही प्रभाव जाणवतो. दोडामार्ग, सांवतवाडी व कुडाळ तालुक्‍यात त्याखाली झळ सोसावी लागते. 

कृषी विभागात मनुष्यबळाचा दुष्काळ
राज्याच्या कृषी अधीक्षक विभागाच्या माध्यमातून हे बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात येते. दुसऱ्या बाजूने विचार करता राज्याच्या कृषी विभागात जवळपास ३० टक्के पदे अद्यापही रिक्त आहेत. पाणलोट समिती कृषी पर्यवेक्षक व राज्य शासनाचा कृषी अधिकारी यांना बंधारे बांधण्यावेळी उपस्थित राहावे लागते. कमी वेळात बंधारे उिद्दष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समीती कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर बऱ्याच वेळा कामाचा ताण पडतो. याचा विपरीत परिणाम उिद्दष्टपूर्तीवर होत आहे.

ॲक्‍शन प्लॅनमध्ये बदल हवा
जिल्ह्याला ७ ते साडेसात हजारांच्या घरात उिद्दष्ट असते. मात्र निम्म्यापर्यंत उिद्दष्ट होत नाही. २०१२ पासूनच गेल्या पाच वर्षांत ही स्थिती आहे. याचा विचार करून बंधारे बांधण्याच्या उपक्रमात नियोजित बदल आवश्‍यक आहेत. शिवाय ही कार्यवाही मनुष्यबळ वाढवून संबंधित विभागाकडे देण्यात यावी. या सर्वांसाठी वेगळा ॲक्‍शन प्लॅन आखल्यास बदल होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com