गवारेड्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

वेंगुर्ले -  तालुक्‍यातील मठ, होडावडा, तुळस भागात गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. गव्यांच्या कळपाच्या झुंडीत सापडून अलिकडेच एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी येथील तहसिलदार शरद गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

श्री. साटेलकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्‍यातील मठ, होडावडा, तुळस भागात गेल्या काही महिन्यांपासून गवारेड्यांच्या कळपाने धुमाकुळ घालून शेतकऱ्यांच्या शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती हे असून त्याचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अलिकडेच 9 एप्रिलला गवारेड्यांच्या कळपाची धडक बसून होडावडे गावातील येथील आगारात काम करणारा एसटी बस चालक सतिश गावडे गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सध्या या भागात गवारेड्यांच्या वावरामुळे प्रत्येक शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

तुळस येथील शेतकरी लाडू राघोबा परब, रमाकांत गुंडू परब, सुशिल बाळकृष्ण परब, भरत लाडू आरावंदेकर, रामचंद्र महादेव परब यांसह अनेक शेतकऱ्यांचे मिरची, चवळी, नाचणी, भुईमूग, कुळीथ, उडीत आदी शेतमालाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जागी जाऊन पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई त्वरित द्यावी. व गवारेड्यांच्या कळपाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत मठ वनपाल वेंगुर्ले यांना देण्यात आली आहे. 

Web Title: Sindhudurg News settlement Gava NCP demand