कोकणच्या किनारपट्टीवर विदेशी पाहुणे

कोकणच्या किनारपट्टीवर विदेशी पाहुणे

वायरी, मालवण - थंडीचा हंगाम सुरू होताच सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर सीगलचे आगमन होते. यंदा थंडी अद्याप सुरू झाली नसली तरी हजारोंच्या संख्येने सीगल दाखल व्हायला सुरवात झाली आहे.

कोकणच्या किनारपट्टीवर सिगल पक्षाचे थवेच्या थवे किनारपट्टीवर पाहायला मिळत आहेत. या पाहुण्यांच्या आगमनामुळे किनारपट्टीवर विलोभनीय दृश्य पहावयास मिळते आहे  दांडी,  देवबाग, देवगड या सिंधुदूर्ग जिल्ह्याची किनारपट्टी सीगलच्या थव्याने भरून गेल्या आहेत.

हा ऑस्ट्रॉलीयन पक्षी सिगल आहे. वातावरणातील बदलामूळे या पक्षांना स्थलांतर  करावे लागते. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी तीन महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात इथले उबदार वातावरण आणि त्यांचे खाद्य मासे या हंगामात किनारपट्टीवर मुबलक प्रमाणात मिळत असते. यामुळे  हे पक्षी कोकण किनारपट्टीचा आसरा घेतात. आधीच कोकणचे किनारे सुंदर आहेत. त्यातच आलेल्या सीगल पक्षाने त्या साैंदर्यात अधिकच भर पडली आहे. या साैंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी वाढते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com