वेंगुर्लेत सहा मिनी पर्ससीन पकडले 

वेंगुर्ले ः येथे पोलिसांनी मिनी पर्ससीन बोटीवर केलेल्या कारवाईत जप्त केलेली मासळी. 
वेंगुर्ले ः येथे पोलिसांनी मिनी पर्ससीन बोटीवर केलेल्या कारवाईत जप्त केलेली मासळी. 

वेंगुर्ले - येथील समुद्रात बारा वावाच्या आत मासेमारी करणाऱ्या सहा मिनी पर्ससीन बोटींवर येथील पोलिसांनी कारवाई केली. या बोटींमध्ये एकूण 60 किलोची मासळी मिळाली. 

मालवण येथून मत्स्य खात्याचे अधिकारी देसाई यांनी घटनास्थळी दाखल होत या बोटींचा पंचनामा केला आहे. उद्या (ता. 18) त्यांना तहसीलदार यांच्याकडे हजर केले जाणार आहे. 
येथील समुद्रात बारा वावाच्या आत मासेमारी करताना सहा बोटी आढळून आल्या. समुद्रात सागरगस्त घालणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सागरकन्या या सागरी पोलीस बोटीच्या मदतीने ह्या बोटी पकडून बंदरावर आणल्या. यातील बोटी या उभादांडा तसेच नवाबाग येथील मच्छिमारांच्या असून त्यांच्यावर मिनी पर्ससीन कायद्यांवये ही कारवाई पोलिसांच्या सागरी पथकाने केली आहे. 

पकडलेल्या बोटींमध्ये साईरथ, दिपलक्षमी, महागणपती, लक्ष्मी कुबेर, आधी दैवत, सेंट अँथोनी आदी सहा बोटींचा समावेश आहे. पोलिसांनी या बोटी पकडल्यानंतर तात्काळ याबाबत मालवण मत्स्य खात्याचे आयुक्त दिलीप वस्त यांना माहिती दिली. त्यानंतर मालवण येथून मत्स्य अधिकारी देसाई हे तातडीने येथे दाखल झाले.

यावेळी नवाबाग येथील मत्स्य खात्याच्या कार्यालयात या सहा हि बोटींचा पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये एकूण 60 किलो मासळी आढळून आली. या मासळीची अंदाजे किंमत 8 हजार एवढी झाली असून ती जप्त केली आहे. उद्या या बोट तसेच ट्रॉलर्स मालकांना वेंगुर्ले तहसीलदार यांच्या कोर्टात हजर केले जाणार असून त्या ठिकाणी दंड ठोठावण्यात येणार आहे. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पी. के. सारंग, सहायक पोलीस निरीक्षक मिलींद कुंभार, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. धुरत, संतोष सरगुडे, डी. एस. कोयंडे आदींनी सहभाग घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com