सुंदरवाडी महोत्सवाची सावंतवाडीत तयारी पूर्ण

सुंदरवाडी महोत्सवाची सावंतवाडीत तयारी पूर्ण

सावंतवाडी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून येथे घेण्यात येणारा सुंदरवाडी महोत्सव उद्या (ता. 23) पासुन धुमधडाक्‍यात साजरा होणार आहे. यासाठी आवश्‍यक असलेली तयारी पुर्ण झाली आहे.

या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्‍मा सावंत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने पहिल्याच दिवशी विविध दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येथील जिमखाना येथे होणार आहे. खवय्यासाठी खास फुड स्टॉल लावण्यात आले आहेत. अन्य विविध उत्पादने तसेच कपडे कटलरी वस्तू आदींचे स्टॉल याठिकाणी असणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री प्रांजल पालकर, भार्गवी चिरमुरे, केतकी पालव, कॉमेडी कलाकार नम्रता आवटे, प्रसाद खांडेकर, संदिप गायकवाड व त्यांच्या समवेत लावणी सम्राज्ञी प्रियांका जाधव, आयटम सॉंग फेम निशा बारोत आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्यसाधुन विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी बजावणाऱ्या विविध रत्नाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सर्व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com