सिंधुदुर्गात पारा 39 अंशावर 

सिंधुदुर्गात पारा 39 अंशावर 

सावंतवाडी - मार्चअखेर उन्हाच्या झळा वाढल्याने जिल्ह्याला चांगलेच चटके सहन करावे लागत आहेत. आतापर्यत 39 अंशापर्यंत पारा पोचला आहे. आतापर्यंतची स्थिती पहाता मे महिन्यात याहीपेक्षा तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे. 

उन्हाळा आला की कडक उन्हाळ्याचे चटके फक्त महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा भागालाच सहन करावे लागत अशी स्थिती होती; मात्र अलिकडच्या दोन-तीन वर्षात या स्थितीत बराच बदल झाला असून कोकणातील सिंधुदुर्गालाही उष्णतेचा झळा चांगल्याच पोचू लागलेल्या आहेत. या आठवड्यात काहीसे वातावरण दमट स्वरुपाचे राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तसे दोन दिवस वातावरणात दमटपणा निर्माण झाल्यामुळे वातावरणातल्या उकाड्यात आणखी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीनुसार 24 ला 36 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली तर 25 ते 27 या तीन दिवसात या हंगामात आतापर्यतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यात हे तीन दिवस 39 अंश सेल्सिअस एवढे सरासरी तापमान राहिले होते.

मार्च अखेरीलाच 39 अंशचा पारा यापूर्वी गेला नव्हता. तोडावर असलेल्या एप्रिल व त्यानंतर मे महिन्यात उष्णतेच्या आणखी झळा जिल्ह्याला सहन कराव्या लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पुढील पाच दिवस मात्र उष्णतेचे कमाल तापमान काहीसे खाली येणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे यात 33 ते 34 अंश सेल्सिअस एवढे तापमान राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान गेला आठवडा या जिल्ह्यासाठी सर्वात तापदायक ठरला आहे. 

पुन्हा दमट... 
जिल्ह्यात वातावरणामध्ये पुन्हा बदल जाणवू लागले आहे. आज दिवसभर दमट वातावरण होते. आर्द्रतेचे प्रमाणही जास्त जाणवत होते. वातावरण असे वारंवार बदलू लागल्यास जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला हादरे बसणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com