वैभववाडी नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

वैभववाडी - वाभवे वैभववाडी नगराध्यक्षपदाची निवडणुक जाहीर होण्यापुर्वी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. इतर मागास प्रवर्गातील महिलेकरीता नगराध्यक्षपद आरक्षित असुन नगराध्यक्षपदाकरीता दिपा गजोबार, अक्षता जैतापकर आणि समिता कुडाळकर यांच्यात चुरस आहेत. सौ.गजोबार यांचे नाव आघाडीवर आहे.

वैभववाडी - वाभवे वैभववाडी नगराध्यक्षपदाची निवडणुक जाहीर होण्यापुर्वी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. इतर मागास प्रवर्गातील महिलेकरीता नगराध्यक्षपद आरक्षित असुन नगराध्यक्षपदाकरीता दिपा गजोबार, अक्षता जैतापकर आणि समिता कुडाळकर यांच्यात चुरस आहेत. सौ.गजोबार यांचे नाव आघाडीवर आहे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी येत्या आठवड्यात पुर्ण होत आहे.यापुर्वीचे नगराध्यपद खुल्यापवर्गाकरीता होते.त्यामुळे सुरूवातीचे सव्वा वर्ष रवींद्र रावराणे आणि त्यानतंर गेले सव्वा वर्ष विद्यमान नगराध्यक्ष संजय चव्हाण हे पद भुषवित आहेत.

दरम्यान आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गातील महिलेकरीता आरक्षित झाले आहे. नगरपंचायतीवर आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान पक्षाची एकहाती सत्ता आहे.स्वाभिमान पक्षाकडे इतर मागास प्रवर्गातील तीन नगरसेविका आहेत.यामध्ये विद्यमान बांधकाम सभापती समिता कुडाळकर,माजी बांधकाम सभापती दिपा गजोबार,आणि माजी शिक्षण सभापती अक्षता जैतापकर यांचा समावेश आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाकरीता या तिघींमध्ये जोरदार चुरस आहे. तिघींनीही नगरपंचायतीच्या विषय समित्यांचे पद भुषविले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांचा अनुभव कमी अधिक फरकाने तिघींच्याही गाठीशी आहे. परंतु सुरूवातीला बाजारपेठेतील गोपाळनगरचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या दिपा गजोबार यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सौ.गजोबार या स्थानिक असुन त्यांच्या समाजाच्या व्होंट बॅंकेच्या विचार पक्षश्रेष्ठी करण्याची शक्‍यता अधिक आहे.समिता कुडाळकर यांच्याकडे सध्या बांधकाम सभापती असल्याने त्यांचे नाव मागे पडण्याची शक्‍यता आहे .अक्षता जैतापकर या पक्षांशी एकनिष्ठ असल्यातरी त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळु शकते.परंतु सध्या नगराध्यक्षपदाकरीता सौ.गजोबार यांच्या नावाची चर्चा आहे. 

Web Title: Sindhudurg News Vaibhavwadi Nagarpanchayat Election