सेल्फीच्या नादात सिन्नरचा युवक आंबोली दरीत पडला

अनंत पाताडे
बुधवार, 6 जून 2018

आंबोली - येथे सेल्फी काढण्याच्या नादात एक युवक 500 ते 700 फूट खोल दरीत पडला. आज दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली.  संपत महाले (वय ३५, सिन्नर, जि. नाशिक)  असे या युवकाचे नाव आहे अशी प्राथमिक माहिती आहे. 

संपत हा कुटुंबासमवेत नाशिकहून गोव्यास जात होते. आंबोली घाटात त्यांनी घाटाचे निरिक्षण करण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला. या प्रयत्नात मुख्य दरडीच्या ठिकाणी हा युवक खोल दरीत पडला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोध कार्य सुरू केले आहे. 

Web Title: Sindhudurg News youngster fall in Amboli Ghat region