सिंधुदुर्गात पाऊस ओसरला; पर्यटकांची गर्दी

तुषार सावंत : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सिंधुदुर्ग : सोमवारी आणि मंगळवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी होवून सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आज जिल्ह्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला. जिल्ह्यातील आठही तालुक्‍यात बुधवारी सकाळी 8 वाजता घेतलेल्या नोंदीत एकूण 353.40 मिलिमीटर, तर सरासरी 44.75 मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 12381 मिमी इतका पाऊस झाला असून सरासरी 1547.62 मिमी इतक्‍या पावसाची नोंद आहे. जिल्ह्यातून पश्‍चिम महाराष्ट्र, बेळगाव, मुंबई आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे. घाटमार्गही सुरळीत असून वर्षा पर्यटनाकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे.

तालुकानिहाय पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये अशी -
तालुका - आजचा पाऊस - एकूण पाऊस
---------------------------------
दोडामार्ग - 38 - (1387)
सावंतवाडी - 67 - (1668)
वेंगुर्ला - 46.40 - (1583.80)
कुडाळ - 57 - (1507)
- 22 - (1871)
कणकवली - 47 - (1494)
देवगड - 21 - (1637)
वैभववाडी - 55 - (1182)