बौद्ध सेवा संघाचे मुंबईत रंगले स्नेहसंमेलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मुंबई येथे झाले. यात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते वयोवृद्ध ३२ कार्यकर्त्यांचा तसेच विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या १७ विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. 

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मुंबई येथे झाले. यात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते वयोवृद्ध ३२ कार्यकर्त्यांचा तसेच विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या १७ विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. 

गुणवंत विद्यार्थी राजदीप विजय नाईक, तेजस अशोक तांबे, रश्‍मी तांबे तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गौतम मुणगेकर, उदय मुंबरकर, डॉ. सायली दयानंद कुवळेकर, डॉ. अक्षय पवार, ऐश्वर्या जाधव, शुभम मुणगेकर, रोहन तांबे, डॉ. शेफाली कदम, मनाली किर्लोस्कर, अनिकेत कासले, नयन कदम, केतन जाधव, मेघन पेडणेकर, रवींद्र तांबे यांचा सत्कार झाला.

सामाजिक क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या आणि ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सीताराम मुणगेकर, केशव पवार, श्रीधर अरुळेकर, अरविंद कांदळगावकर, शंकर कदम, जयंत तांबे, भिवा तांबे, आबाजी यादव, अनाजी यादव, वासुदेव तांबे, हिरोजी सोमा, पांडुरंग 
कदम, लवेश कदम, सुधाकर कळसुलकर, वसंत कुपवडेकर, गुणाजी कदम, कमळाबाई माईणकर, पार्वती जाधव, शोभा दारोमकर, इतुमती पवार, शांताबाई कदम, सत्यवती कदम, शुभांगी कदम, गीता बावकर, सुषमा पोखरणकर, हरी पवार, सावळाराम तांबे, श्रीधर किर्लोस्कर, श्रीधर यादव, सदाशिव कदम, शांताराम मुणगेकर, जनार्दन जाधव आदींचा सत्कार झाला, तर रवींद्र तांबे यांना वृत्तपत्र लेखनकार म्हणून सन्मानित करण्यात आले. 
प्रास्ताविक संघाचे सरचिटणीस बाबूराव सावडावकर यांनी 
केले. सूत्रसंचालन व निवेदन रवींद्र तांबे आणि परशुराम नादकर 
यांनी केले.

कोकण

सावंतवाडी : शहराच्या बाहेर महामार्गावर प्रवाशांना सोडणाऱ्या खासगी बसचालकांना दणका देण्यासाठी सावंतवाडी तालुका...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

महाड - शहरालगत पी. जी. सिटी संकुलातील गोविंद सागर इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये  आज एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याचा...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - कुवारबाव रेल्वेस्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाच्या पोटात सुरी खुपसून खून झाला होता. या खटल्यात आरोपीला...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017