आंबोली धरणक्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

कणकवली - जिल्ह्यात गेले दोन महिने अविरत पावसामुळे एक मोठा, दोन मध्यम आणि 29 लघु धरण प्रकल्पांत उपयुक्त पाणी साठा 770 द.ल. घ. मी.वर पोचला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला हा पाणीसाठा 540 द.ल.घ.मी. होता. यंदा सर्वच धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून आंबोली धरण क्षेत्रात सर्वाधिक 4261 मि.मी. पाऊस झाला आहे. लघुपाटबंधारेच्या 22 धरणांत पाणीसाठा शंभर टक्केवर पोचला आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पातील तिलारीच्या जलविद्युतचा उपयुक्त साठा 85.41 टक्के असून एकूण साठा शंभर टक्के झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्पाची 98 टक्के उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता पूर्ण झाली आहे. कोर्ले सातंडी शंभर टक्के पाणीसाठा असून विसर्गही सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 32 प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा 85 टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

11 ऑगस्टअखेर पाऊस असा -
शिवडाव धरणात 100 टक्के, नाधवडे 100 टक्के, ओटव 100, देंदोनवाडी 10.24, तरंदळे 56.52, आडेली 100, आंबोली 100, चोरगेवाडी 86.97, हातेरी 100, माडखोल 100, निळेली 100, ओरोस बु. 56.82, सनमटेंब 100, तळेवाडी डिगस 72.72, दाबाचीवाडी 89.05, पावशी 100, शिरवल 100, कुळास 100, वाफोली 100, कारिवडे 100, धामापूर 84.64, हरकुळ खुर्द 100, ओसरगाव 100, ओझरम 100, पोईप 74.06, शिरगाव 70.14, तिथवली 100 आणि लोरे धरणात 100 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
---------
धरण क्षेत्रातील पावसाची स्थिती....
---------
धरणक्षेत्र - एकूण पाऊस (मि.मी.)
---------------------
आंबोली - 4261
हरकुळ खुर्द - 3683
कोर्ले सातंडी - 3508
तरंदळे - 3264
नाधवडे - 3264
देवघर - 2946
तिलारी - 2802
--------------------

टॅग्स

कोकण

कणकवली - राज्य शासनाने पवित्र (Portal for Visible to all Teacher Recruitment)  या संगणक प्रणालीद्वारे राज्यातील सर्व...

12.42 PM

रत्नागिरी - विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर संततधार...

12.42 PM

रत्नागिरी - हमारी युनियन हमारी ताकद.. हम सब एक है.. असा नारा देत ईपीएस (१९९५) कर्मचाऱ्यांच्या गेली २१ वर्षे होत असलेल्या...

12.36 PM