पोलिस गुन्हे शोध पथकात रॅम्बो दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

रत्नागिरी - रत्नागिरी पोलिस गुन्हेशोधक पथकातील ‘सम्राट’ श्‍वानाच्या मृत्यूनंतर ‘रॅम्बो’ या १५ महिन्याच्या डॉबरमॅन जातीच्या श्‍वानाने त्याची जागा घेतली. नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर २० जानेवारीला तो या पथकात दाखल झाला. 

कोकण परिक्षेत्रामध्ये तीन वेळा सुवर्ण आणि कास्यपदक पटकावलेल्या रत्नागिरी पोलिस गुन्हे शोधक श्‍वानपथकातील श्‍वान रॉकी ऊर्फ ‘सम्राट’ या श्‍वानाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. कॅन्सरने मूत्रपिंड फुटल्याने त्याचा मृत्यू झाला. ‘हिरा’ नंतर ‘सम्राट’ने साडेचार वर्षे पथकाचा भार सांभाळला होता.

जिल्ह्यातील अनेक गुन्हे त्याने उघड केले होते. हिरा आणि सम्राटही गेल्यामुळे पोलिस श्‍वान पथकाविना आहे. मात्र पोलिस दलाने यापूर्वीच त्याची खबरदारी घेऊन डॉबरमॅन जातीचा रॅम्बो हा श्‍वान घेतला होता. त्याला पुण्याला प्रशिक्षणासाठी पाठवले होते. पोलिस कर्मचारी भूषण राणे, वैभव आंब्रे हे त्याची काळजी घेतात. सम्राटच्या तोडीस तोड गुन्हे शोधण्यात रॅम्बोची कामगिरी होईल, असा विश्‍वास या पथकाने केला आहे.