सावंतवाडीत नगराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

 सावंतवाडी - हल्ला झालेल्या गाडीची पाहणी करताना नगराध्यक्ष बबन साळगावकर बाजूला संजू परब व अन्य नगरसेवक.
सावंतवाडी - हल्ला झालेल्या गाडीची पाहणी करताना नगराध्यक्ष बबन साळगावकर बाजूला संजू परब व अन्य नगरसेवक.

सावंतवाडी - येथील पालिका आवारात ठेवलेल्या नगराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार काल (ता.15) रात्री घडला. शहरातील विकासकामे करताना काही तरी थेट निर्णय घेतल्याच्या रागातून हा प्रकार घडला असावा; मात्र अशा भ्याड हल्ल्यांना मी भिक घालत नाही, अशा शब्दात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज आपली प्रतिक्रीया दिली.

या मागे नेमका कोण आहे, याबाबत आपण आत्ताच काही सांगू शकत नाही. याचा शोध पोलिसांनी घ्यावा आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. तक्रार दाखल करण्याच्या सुचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

श्री. साळगावकर म्हणाले, ""मी भटवाडी येथील नवरात्र उत्सव मंडळाकडे काल (ता.15) रात्री कार्यक्रमासाठी होतो. त्यावेळी पालिका कर्मचारी रघुनाथ तावडे यांचा फोन आला आणि पालिका कार्यालयासमोर उभ्या करुन ठेवलेल्या आपल्या शासकीय गाडीवर अज्ञाताने दगड मारल्याचे त्यांनी सांगितले. मी याबाबतची माहीती पोलिसांना दिली. त्यांनी त्याठिकाणी तात्काळ धाव घेवून पंचनामा केला. जबाब नोंदविला आहे.''

दरम्यान या प्रकारानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी श्री. साळगावकर यांची पालिकेत जावून भेट घेतली. झालेल्या प्रकाराचा त्यांनी निषेध केला.

हा सर्व प्रकार म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे. काही वर्षापुर्वी आपल्यावर असाच काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यात काही राजकीय वैमनस्य आहे किंवा अन्य काही हे आत्ताच सांगू शकत नाही; परंतु मी शहरात विकासकामे करीत असताना काही थेट निर्णय घेतले आहेत. या रागातूनही लोकांकडुन हा प्रकार करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही; मात्र अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरत नाही.''
- बबन साळगावकर,
नगराध्यक्ष सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com