‘डिजिटल’मुळे विद्यार्थी भरारी घेतील - प्रकाश सावंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

कणकवली - डिजिटल शाळा ही काळाची आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थ एकत्र आले ही अभिमानाची बाब आहे. डिजिटल शाळेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विज्ञान क्षेत्रातही येथील विद्यार्थी भरारी घेतील, असे मत पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश सावंत यांनी व्यक्त केले.

कणकवली - डिजिटल शाळा ही काळाची आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थ एकत्र आले ही अभिमानाची बाब आहे. डिजिटल शाळेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विज्ञान क्षेत्रातही येथील विद्यार्थी भरारी घेतील, असे मत पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश सावंत यांनी व्यक्त केले.

तालुक्‍यातील वरवडे-फणसवाडी प्रशालेत आज डिजिटल क्‍लासरूमचे उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुहास सावंत होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजन चव्हाण, सरपंच अंजली आरोसकर, उपसरपंच बापू सावंत, काँग्रेस उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, भाई सावंत, माजी सरपंच भाई बोंद्रे, सुनील सावंत, उमाकांत बोंद्रे, बाळकृष्ण सावंत, एकनाथ शिंदे, शिवदास सादये, हनुमंत बोंद्रे, प्रकाश फर्नांडिस, मुख्याध्यापिका श्रद्धा हजारे, चंद्रकांत बोंद्रे, मनीषा मेस्त्री, अंकुश पवार, सौ. कुलकर्णी, प्रदीप सावंत, आप्पा सावंत, नाना देसाई उपस्थित  होते. 

सुहास सावंत म्हणाले, ‘‘मी ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेचे आपण काही तरी देणे लागतो याच भावनेतून डिजिटल उपक्रमासाठी छोटीशी मद्दत केली.’’ प्रशालेस भाई सावंत यांनी एलईडी, उमाकांत बोंद्रे यांनी संगणक, मुंबई मंडळाने लॅपटॉप, रघुनाथ मारुती नाईक यांनी डिजिटल स्कॅनर कम प्रिंटर, तर वरवडे ग्रामपंचायतीने एलईडी प्रोजेक्‍टर, स्क्रीन देणगी स्वरूपात दिली. इतर ग्रामस्थांनी रोख स्वरूपात मदत केली. या वेळी या सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. समिती अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.  प्रकाश फर्नांडिस यांनी सूत्रसंचालन केले. श्रद्धा हजारे यांनी आभार मानले.

Web Title: student success by digital