गणपतीपुळे येथे जालन्यातील पर्यटकाला वाचवण्यात यश

गणपतीपुळे येथे जालन्यातील पर्यटकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी - गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेल्या जालनातील एका पर्यटकाला जीवरक्षकांनी वाचवल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता घडली. जालना जिल्ह्यातील टाकळी-परतूड येथून सुनील प्रकाश काऊतकर हे गणपतीपुळ्यात आले होते.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास ते गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी गेले. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते समुद्रात गटागंळ्या खाऊ लागले. बुडत आहोत याची जाणीव होताच प्रकाश काऊतकर यांनी वाचविण्यासाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यात उड्या घेतल्या. जीवरक्षक अनिकेत राजवाडकर, रोहित चव्हाण, आशिष माने, अक्षय माने, मिलिंद माने यांनी प्रकाश काऊतकर यांना सुखरुप पाण्याबाहेर काढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com