उन्हाळा व पाणीटंचाईमुळे पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

सुनील पाटकर
शुक्रवार, 4 मे 2018

महाड : रायगड आणि परिसरातील गावांना जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या झळा त्यातच अंगाची लाहीलाही करणारा तीव्र उन्हाळा यामुळे रायगड किल्ल्याकडे यावर्षीच्या उन्हाळी हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. याचा मोठा परिणाम रायगडावरील पर्यटनावर झाला असून पर्यटन मंदावल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. 

महाड : रायगड आणि परिसरातील गावांना जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या झळा त्यातच अंगाची लाहीलाही करणारा तीव्र उन्हाळा यामुळे रायगड किल्ल्याकडे यावर्षीच्या उन्हाळी हंगामात पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. याचा मोठा परिणाम रायगडावरील पर्यटनावर झाला असून पर्यटन मंदावल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. 

यावर्षी मार्च महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. तिव्र उन्हामुळे बाहेर पडणेही दुरापास्त झाले आहे.चाळीस अंशाहून अधिक तापमान या काळात होउ लागल्याने गेल्या काही वर्षांपासून रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे. त्यातच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.गडावर पाण्याची सोय जरी असली तरी ती अपूरी आहे गडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा,पाचाड, हिरकणीवाडी, रोप वे येथे मात्र चांगलीच पाणीटंचाई आहे.या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. रायगडावर निवासाची पुरेशी सोय नसल्याने अनेकजण पायथ्याशी निवास करतात. न्याहरी व जेवणही येथेच करतात. यावर्षी पाणीटंचाईमुळे पर्यटकच नव्हे तर येथील ग्रामस्थही हैराण झाले आहेत.

व्यवसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान तशी भागवायची हा प्रश्न आहे. रायगडावरील तीव्र उन्हाळा, रायगड फिरताना अंगातून येणा-या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. केवळ 25 टक्के पर्यटकच रायगडकडे येत पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. या हंगामात रायगड रोप वेने दररोज 1 ते 2 हजार पर्यटकांची ये जा होत असते. परंतु ही संख्या घटून 200 ते 500 च्या दरम्यान आली आहे.शाळांना सु्ट्टी पडली असुन काहि दिवसांपूर्वी सलग चार दिवस सुट्ट्याही आल्या होत्या परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. राज्यातील विविध भागातून येणा-या पर्यटकांना त्यांच्या गावातही दुष्काळ व पाणीटंचाईच्या झळा पोहचल्यानेअनेक कुटुंब पर्यटनासाठी घरा बाहेर पडली नाही. गडावरील गाईड, रायगड, पाचाड व परिसरातील हॅाटेल व्यवसायिक, दहीताक विक्रेते, रोपवे तसेच अन्य व्यवसायिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.

उन्हाळा व पाणीटंचाई यावर्षी अधिक जाणवत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या फारच कमी झाली आहे. येथे कौटुंबिक पर्यटक सुट्टीत जास्त येतात यावर्षी या पर्यटकांची संख्या मंदावली आहे.यामुळे व्यवसायही कमी झाला आहे. 

- गणेश ढवळे, विक्रेता 

Web Title: summer and lack of water due to less rush on raigad fort