वेंगुर्लेत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

वेंगुर्ले - शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याने पालिका व पोलीस यंत्रणेचे प्रत्येकी दोन कर्मचारी वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवतील, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर पालिकेच्या उपविधीच्या तरतुदीनुसार दैनंदिन मार्केट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष राजन गिरप यांनी दिली.

शहरात बाजारपेठेतील पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्याच्या कडेला लावत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. यातच सध्या पर्यटन हंगाम असल्याने चारचाकी घेऊन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे याठिकाणी गर्दी होते. यातच व्यापाऱ्यांना माल पुरवणाऱ्या मोठ्या मालवाहू गाड्या या दुपारी बारा ते एक बाजारपेठेच्याच कालावधीत येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. यासाठी पालिका नगराध्यक्ष, नगरसेवक व प्रशासन यांनी दुपारी एक ते चार व रात्री आठनंतर या कालावधीत मालवाहू गाड्यांना परवानगी दिली आहे. यावर पालिका प्रशासन व पोलीस यांचे स्वतंत्र दोन कर्मचारी यावर नियंत्रण ठेवणार आहेत. ही माहिती नगराध्यक्ष गिरप यांनी दिली.

येथील मार्केट सुस्थितीत ठेवण्याकरिता मार्केट उपविधी तरतुदीनुसार सर्व किरकोळ व दररोजच्या व्यापाऱ्यांना उपविधीच्या तरतुदींचे पालन करावे लागणार आहे. त्याप्रमाणेच पालिका प्रशासन तरतुदीनुसार मार्केटमधील जागेची आखणी करून देणार असून दैनंदिन मार्केट प्रमाणेच कार्यवाही केली जाणार आहे. या निर्णयामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार, असे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.