प्रांतांसह तहसीलदारांचे निवासस्थान वापराविना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

कणकवली - प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलल्या हेडक्वॉटरला राहावे म्हणून लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासाठीचे निवासस्थान सध्या वापराविना पडून आहे. शासकीय जागेत गेल्या दोन वर्षांपूर्वी ही निवासस्थाने पूर्ण झाली असून केवळ परिसर स्वच्छ नसल्याने अधिकारी या राहत नाहीत. 

उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे असून या कार्यालयाच्या आवारात कणकवली तहसीलदारांसाठी निवासस्थान बांधण्यात आले आहे. तर तहसील कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधले आहे. या निवासस्थानाची बांधकामे दोन वर्षापूर्वी पूर्ण झाली. अंतर्गत कामकाजही पूर्ण झाले आहे. 

परंतु नव्या निवासस्थान इमारतीच्या बाजूचा परिसर अस्वच्छ आहे. हा परिसर स्वच्छ करून मिळावा, अशी मागणी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकामकडे केली आहे. परंतु उपअभियंता यांच्याकडे निधी नसल्याने परिसर स्वच्छ झालेला नाही. या इमारतींचे हस्तांतर महसूलकडे करण्यात आले आहे. परंतु वापरच सुरू होत नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे.

Web Title: tahsildar residence without use