पाली: टेम्पो व मोटारसायकलचा अपघात, एकाचा मृत्यु

accident
accident

पाली - पाली नांदगाव मार्गावर शुक्रवारी(ता.२५) सायंकाळी मोटारसायकलची टेम्पोला धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. यामध्ये मोटारसायकल जळून खाक झाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निलेश सुधाकर पाटील(रा. तरणखोप) हे पेण हमरापूर येथून टेम्पोतून गणपतीच्या मुर्ती सुधागड तालुक्यातील नागशेत गावात घेवून आले होते. गणेशमुर्ती उतरवून शुक्रवारी (ता.२५) सायंकाळी परत पेण येथे जाण्यास निघाले होते. यावेळी नांदगाव बाजूकडे येणारा मोटारसायकलस्वार मंगेश अंकुश वाघमारे (रा. दांड कातकरवाडी) नांदगाव बसस्टॉपजवळ विरुद्ध बाजूला जावून टेम्पोला धडकला. या अपघातात मंगेश गाडीवरुन उडून पाठीमागे रोडवर पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्याचवेळी मंगेशच्या मोटारसायकलने अचानक पेट घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पि.डी.पाटील करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com