विवाहानंतर वीस वर्षांनी बाळाची लागली चाहूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे यश; महिलेचे वजनही घटवले; डॉ. शिंदे यांचे उपचार

रत्नागिरी - लग्नानंतर एका जोडप्याला वीस वर्षे मूलबाळ झाले नाही. अखेर टेस्ट ट्यूब बेबीचेही प्रयत्न झाले, पण यश आले नाही. वाढलेले वजन आणि अनियमित मासिक पाळीमुळे या महिलेस मूल होत नव्हते. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी या महिलेवर उपचार केले. नियमित व्यायामाने या महिलेचे ३२ किलो वजन घटले व पाळी नियमित झाली. आययूआय केल्यानंतर ही महिला गरोदर राहिली. लग्नानंतर २० वर्षांनंतर त्यांच्या घरी बाळ रांगणार आहे.

अलीकडे विविध कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी आयव्हीएफ, आययूआय किंवा प्रगत तंत्रज्ञान असलेल्या इक्‍सीचे उपचार घेऊन टेस्ट ट्यूब बेबी जन्माला येत आहेत; परंतु अत्याधुनिक उपचार करूनही यश न मिळाल्याने हे जोडपे निराश झाले होते. गेल्या २० वर्षांत या जोडप्याने बाळासाठी प्रयत्न करूनही देवाने यांच्या पदरात हे सुख टाकले नव्हते. या जोडप्याने टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही मूल झाले नाही. पतीच्या नोकरीमुळे हे जोडपे रत्नागिरीत वास्तव्यास आले. त्यांना मूल होईल ही अपेक्षासुद्धा राहिली नव्हती; मात्र एका मित्राच्या सल्ल्यामुळे हे जोडपे डॉ. तोरल यांच्या रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये तपासणीसाठी आले.

या जोडप्याकडून सर्व माहिती जाणून घेताना डॉ. तोरल यांनी मासिक पाळीबाबत विचारणा केली. ती पहिल्यापासूनच अनियमित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महिलेचे वजन ८२ किलो असल्याचे तपासणीअंती समजले. या जोडप्याच्या अडचणी लक्षात घेऊन वंध्यत्वावरचे उपाय करण्यापूर्वी या महिलेस वजन घटवण्याचे, डाएट योग्य करण्याचा आणि मासिक पाळी नियमित करण्याचे उपाय डॉ. तोरल यांनी करण्यास सुरुवात केली. पीसीओडी झालेल्या या महिलेसाठी त्यांनी मग खाण्या-पिण्याच्या वेळेपासून कधी काय खावे हेही नेमून दिले. वजन घटवण्यासाठी व्यायामाचा सल्ला दिला. डॉ. तोरल यांचा सल्ला ऐकून महिलेने सकारात्मक प्रयत्न सुरू केले. डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू झाला. ५ ते ६ महिन्यांतच महिलेचे वजन २२ किलोंनी घटले. त्यानंतरही पुढे १० किलो वजन कमी झाले. वेळेत जेवण व पोषक आहार सुरू झाला. पाळीही नियमित झाली. त्यानंतर डॉ. तोरल यांनी वंध्यत्वावरचे उपचार करण्यास सुरुवात केली. आययूआय केल्यानंतर त्या महिलेला बाळाची चाहूल लागल्याने आता जोडपे समाधानी आहे.

Web Title: test tube baby in ratnagiri