..तर तेलीमुक्त भाजप करण्याची वेळ येईल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

कणकवली - कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळालेल्या राजन तेली यांनी भाजपत आपली नसलेली पत वाढविण्यासाठी जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याची बालिश वक्तव्ये करू नयेत. श्री. तेली यांनी स्वतःची पक्षात काळजी घ्यावी न पेक्षा प्रमोद जठार, संदेश पारकर द्वही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तेली मुक्त भाजप करतील, अशी प्रतिटीका समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून केली.

श्री. तेली यांनी सावंतवाडीतील पत्रकार परिषदेत जिल्हा कॉंग्रेस मुक्त करणार असे वक्तव्य केले होते. याला जाधव यांनी पत्रकातून उत्तर दिले. पत्रकात म्हटले आहे की, श्री. तेली यांचे भाजपमधील वय किती, कॉंग्रेसपक्ष किंबहुना श्री. राणे यांच्या राजकीय छत्रछायेखाली वय किती, हे अगोदर त्यांनी आत्मपरीक्षण करावे, मगच राजकीय स्वार्थासाठी कृतघ्नपणे टीका करावी. राजकीय जीवनात टीकाटीपण्णी या होत असतात. त्याला सुद्धा वैचारिक पातळी हवी असते ती तेली यांनी कधीच गमावली आहे. त्यांच्याकडून अपेक्षा करणेही चुकीचे आहे. हिंमत असेल तर भाजप पक्षाच्या माध्यमातून महामंडळाकडे अध्यक्षपद किंवा आमदारकी मिळवून दाखवा. तेली भाजपमध्ये आपली राजकीय वजन वाढविण्यासाठी राणे परिवार व कॉंग्रेस पक्षावर सतत टीका करून वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेलींच्या टिकेची गरज कॉंग्रेस पक्ष कधीच घेत नाही. त्यांची वक्तव्ये म्हणजे मुदतबाह्य एखाद्या उत्पादनासारखीच आहे. तेलींनी भाजपकडून आमदारकी किंवा एखादे महामंडळ पदरात पाडून दाखवावे.