‘थर्टी फर्स्ट’साठी मिळुनी साऱ्याजणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

चिपळूण - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सारे सज्ज झाले असून, यावेळी महिलांचा विशेष पुढाकार आहे. इनडोअर पार्टीच्या जल्लोषासह सोहळ्याला विविध सामाजिक उपक्रमांची झालरही लाभणार आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी महिलांच्या स्वतंत्र पार्टीची संकल्पना चिपळुणात रुजताना दिसत आहे.

थर्टी फर्स्टसाठी तरुणाईच्या विविध ग्रुप्सनी ठिकठिकाणी जल्लोष पार्टीचे आयोजन केले आहे. शनिवारी सांयकाळपासूनच या जल्लोषाला उधाण येणार आहे. विविध सामाजिक संस्थांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.

यावर्षीचा थर्टी फर्स्ट शनिवारी आल्याने विविध हॉटेलमध्ये मांसाहारासह शाकाहारी मेन्यूवरही भर असणार आहे. त्याशिवाय विविध फॅमिली पॅकेजही जाहीर झाली आहेत. शहरात सध्या विविध ठिकाणी सुरू झालेल्या हॉटेल, रिसॉर्ट आणि ढाब्यांवरही थर्टी फर्स्टची धूम सुरू झाली आहे. म्युझिकल शो, डान्स पार्टीचे आयोजनही काही ठिकाणी करण्यात येणार आहे. पुरुष घराबाहेर थर्टी फर्स्ट साजरा करतात. परिसरातील महिलांनी एकत्र येऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याची संकल्पना येथे सुरू झाली आहे. मागील दोन-तीन वर्षापासून सुरू झालेल्या या पार्टीने आता ठिकठिकाणी मूळ धरले आहे. महिला आणि मुलींनी केवळ टीव्हीवरचे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यापेक्षा वेगळे काही करण्याचा प्रवाह महिलांमधून पुढे आला. त्यातून स्नेहभोजनाची संकल्पना मांडली. 

एकाच परिसरातील महिलांनी एकत्र येऊन आपापल्या घरातून जेवण आणायचे आणि सर्व महिला व मुलींनी मिळवून एकत्र त्याचा स्वाद घ्यायचा. कुणाला वाटेलच तर एखादा मोठा टीव्ही बाहेर आणायचा आणि त्यावरील मनोरंजनाचे कार्यक्रम एकत्रपणे पाहायचे. कुणाला नकला येत असतील, कुणाला कविता वाचायची असेल किंवा कुणाला एखादा चित्रपटातील प्रसंग सादर करायचा असेल, तर त्याचे तेथे स्वागतच असते. मिळून साऱ्याजणींचा हा आनंदोत्सव रंगणार आहे. पेठमाप, गोवळकोट, परशुराम, फरशीतिठा, कालुस्ते हा भाग शहराच्या लोकवस्तीपासून काहीसा लांब आहे. त्याठिकाणी असलेल्या नातेवाइकांच्या घरातील अंगणात घरगुती पार्टीचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे.

सेलिब्रेशनचा आनंद महिलांनाही लुटता यावा यासाठी घरगुती मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा बेत एकाच परिवारातील महिला एकत्र येवून आखला आहे. त्याला व्यावसायिक स्वरूप नाही. कुटुंबीयांनी नववर्षाचे सेलिब्रेशन करावे, यासाठी आम्ही महिलांपासून सुरवात केली. 
- उल्का पवार,  गोवळकोट

Web Title: thirty first party celebration