‘सह्याद्री’च्या विद्यार्थ्यांनी बनवल्या तीन कार

‘सह्याद्री’च्या विद्यार्थ्यांनी बनवल्या तीन कार

‘ॲटम ०१७’ स्पोर्टस्‌ कारने लक्ष वेधले, एक तीनचाकी सायकलही बनवली

सावर्डे - मन, मनगट आणि मेंदूचा मिलाफ झाला की अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि सर्जनशीलतेच्या जोरावर सह्याद्री पॉलिटेक्‍निक कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कमी खर्चात चार कारची निर्मिती केली आहे. यामधील ‘ॲटम ०१७’ ही रेसिंग कार लक्षवेधी ठरली असून १२०० सीसी क्षमतेची, ७०० किलो वजन, २० फूट लांबीची कार आकर्षक दिसते. केवळ नऊ महिन्यात ९० हजार रुपयांमध्ये स्पोर्टस्‌ कार तयार करण्यात आली आहे.

ॲटम कारला मागील बाजूस इंजिन, दोन सीटर, स्केलेटन (सांगाडा) स्ट्रीम लाईन बॉडी, गती १८० वेग क्षमता, हाताळण्यास योग्य स्टेअरिंग, कमी उंची, भारतातील सर्वात कमी किमतीची स्पोर्टस्‌ कार असल्याचे प्राचार्य मंगेश भोसले यांनी सांगितले. यश पाटील, रोहन जाधव, किरण सावंत, रोहित काताळे व प्रसाद पवार व विद्यार्थी यांनी बनवली आहे. गो-कार्ट ही कार दुचाकीचे इंजीन वापरून बनवली आहे.

एका व्यक्तीसाठी हलक्‍या वजनाची असणारी कार २२ हजार रुपयांत बनवण्यात आली आहे. पुढे-मागे सस्पेंशन बसविण्यात आले आहे. स्वराज पाटोळे, आदित्य सावंत, सूरज गमरे, अस्लम शेख, प्रितेश कराडकर, आदित्य रेवंडीकर, संकेत कदम यांनी ही कार बनवली आहे. सौरऊर्जेवर चालणारी तीनचाकी मिनीकार १८ हजार रुपयांमध्ये बनविण्यात आली असून यामध्ये एकच व्यक्ती बसू शकते. अपंगासाठी ट्राय सायकल बनविण्यात आली आहे. गिअरशिवाय असणाऱ्या तीनचाकी सायकल बनविण्यासाठी १२ हजार रुपये खर्च आला आहे. ही ट्रायसायकल अफराज राजिवटे, संगम बच्छाव, मासूम कुडूपकर, ऋषिकेश कारकर, ऋषिकेश कोकाटे, ओंकार भुवड, बनविण्यात आली आहे. 

औद्योगिक क्षेत्रात आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर पॉलिटेक्‍निकमध्ये शिकणारे विद्यार्थी उद्याचे चांगले अभियंते आहेत. सह्याद्रीचे विद्यार्थी जेथे जातील तिथे क्रांती घडवतील.
- शेखर निकम, कार्याध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था.

दुचाकीचे इंजिन वापरून गो-कार्ट कार
सौरऊर्जेवरील मिनी कार
अपंगांसाठी गिअरशिवाय तीनचाकी सायकल
‘ॲटम’ची निर्मिती नऊ महिन्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com