मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळ वाहतुक कोंडी

अमित गवळे
शनिवार, 26 मे 2018

पाली - उन्हाळी सुट्टयांमुळे बहुतांश चाकरमानी व पर्यटक कोकणात आपल्या गावाककडे व फिरायला जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. शनिवारी (ता.२६) मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळील दोन्ही अरुंद पुलांवर सकाळपासून वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना त्रास झाला.

मागील पाच ते सहा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी मार्गाच्या रुंदिकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यातच या मार्गावर अनेक अरुंद पुल आहेत. परिणामी महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यास येथे वारंवार प्रचंड वाहतुक कोंडी होते. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळ कुंडलीका व आणखी एका छोटया नदीवर असलेल्या अरुंद पुलावर तर सतत वाहतुक कोंडी होते. या पुलावरुन एका वेळी एकच मोठे वाहन जावू शकते. मात्र बर्याच वेळा वाहनचालक नियम तोडून व पुढे जाण्याच्या घाईने पुलावरुन दोन्ही बाजुने गाड्या नेतात. मग अशा वेळी विनाकारण वाहने अडकून बसतात. आणि येथे वारंवार वाहतुक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात.

कोंडी का ?
महामार्गावरील वाहतुक पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचे कुचकामी प्रयत्न करतात. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे धीम्या गतीने सुरु असलेले काम, अरुंद रस्ता व पुल, बेशिस्त वाहनचालक, लेन सोडून पुढे निघालेली वाहने व अवजड वाहने यामुळे वारंवार वाहतुक कोंडी होते.

Web Title: traffic near Kolad on Mumbai-Goa highway