एमआयडीसीच्या समस्या सोडविण्यास प्रयत्नशील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

कुडाळ- औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या तसेच शासनाच्या नवीन धोरणांबाबत सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहे. नवीन उद्योग येताना स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही एमआयडीसी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आनंद बांदिवडेकर यांनी दिली.

कुडाळ- औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या समस्या तसेच शासनाच्या नवीन धोरणांबाबत सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहे. नवीन उद्योग येताना स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही एमआयडीसी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आनंद बांदिवडेकर यांनी दिली.

येथील एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच निवडणूक समितीचे अध्यक्ष कमलाकांतच परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी बिनविरोध निवड घोषित केली. अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, उपाध्यक्ष उमेश गाळवणकर, सचिव अरुण बागवे, सहसचिव राजाराम गवस, खजिनदार संजीवकुमार प्रभू, सहखजिनदार सौ. श्रद्धा बेलवलकर यांचा यात समावेश आहे.
नूतन अध्यक्ष श्री. बांदिवडेकर म्हणाले, ""गेली वीस वर्षे मी औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे. या कालावधीत असोसिएशनची खजिनदार व सचिवपदे मी सांभाळली आहेत. या अनुभवाच्या जोरावर सर्वांच्या सहकार्याने मी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. येथील औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, नवनवीन उद्योग येऊन स्थानिकांना रोजगार संधी मिळावी, येथील उद्योजकांच्या विविध समस्या आहेत. शासनाची नवीन धोरणे येत आहेत. अशावेळी त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून प्रश्‍न सोडविण्याला मी प्राधान्य देतो. माजी अध्यक्ष अमित वळंजू, रमण चव्हाण, सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने एमआयडीसी असोसिएशनचे संकुल झाले आहे. या संकुलाचा वापर उद्योजकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केला जाईल.'' सर्व उद्योजकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. बांदिवडेकर यानी व्यक्त केली. आभार संजीवकुमार प्रभू यानी मानले.

कोकण

रत्नागिरी - जिल्ह्यातील कातळशिल्पांचे नोटीफिकेशन करुन ती संरक्षित करण्यासाठी राज्य व केंद्राच्या पुरातत्त्व अधिकाऱ्यांशी चर्चा...

03.36 PM

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोटारीच्या डिकीतून नेण्यात येत असलेल्या विदेशी मद्याच्या ३८४बाटल्या जप्त केल्या...

03.36 PM

राजापूर - तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारल्या जात असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळल्याचे सांगितले...

02.33 PM