मिरजोळेत सापडली बेवारस एअरगन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

रिव्हॉल्व्हर किंवा रायफल असल्याची खबर होती. प्रत्यक्षात पाहणी केली असता ती एअरगन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी : तालुक्‍यातील मिरजोळे-पाडावेवाडी येथे बेवारस स्थितीत पडलेली एअरगन सापडली आहे.

रेल्वे पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्यांनी ग्रामीण पोलिसांना याची खबर दिली. पोलिस निरीक्षक अनिल विभूते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याची माहिती घेतली. रिव्हॉल्व्हर किंवा रायफल असल्याची खबर होती. प्रत्यक्षात पाहणी केली असता ती एअरगन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भात श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले असून, संबंधिताचा माग काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. बेवारस टाकण्यामागे काय कारण? काहीतरी गुन्हा करून ती टाकण्यात आलेली नाही ना? याची खात्री ग्रामीण पोलिस करीत आहेत.