‘ऊर्जा’ विशेषांक व्यावसायिकांना दिशादर्शक - सौ. उल्का जाधव

‘ऊर्जा’ विशेषांक व्यावसायिकांना दिशादर्शक - सौ. उल्का जाधव

दापोली - ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ विशेषांक कोकणातील तरुण, विविध उद्योग-व्यवसाय करीत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची नवीन व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन दापोली नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव यांनी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘ऊर्जा’ विशेषांकाचे प्रकाशन नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव, उपनगराध्यक्षा रजिया रखांगे, नगरसेवक सुहास खानविलकर, प्रशांत पुसाळकर, मंगेश राजपूरकर, केदार परांजपे, अविनाश मोहिते, शबनम मुकादम, नम्रता शिगवण, रमा तांबे, परवीन रखांगे, हरीज केबीसीचे हरेश कांबळे, प्रसाद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सौ. जाधव बोलत होत्या.

‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या ऊर्जा पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार प्रसाद रानडे, शैलेंद्र केळकर, जगदीश वामकर, शशिकांत राऊत, महेश महाडिक, अजित सुर्वे, दाविक्षेचे मुख्य विश्वस्त संदेश मोरे, सुयोग घाग, तसेच ‘सकाळ’चे बातमीदार अशोक चव्हाण आणि नगरपंचायतीचे दीपक सावंत, अमित रेमजे, बाबा शिंदे, संदीप जाधव, स्वप्नील महाकाळ, विजय मोहिते, मंगेश जाधव, अरुण मोहिते आदी कर्मचारी उपस्थित होते.  दापोली बातमीदार हर्षल शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. 

उच्च दर्जाचा कागद, छपाई आणि परिपूर्ण माहिती असलेला ‘ऊर्जा’ हा एक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवण्यासारखा विशेषांक असल्याचे गौरवोद्‌गार येथील बाबा शिंदे यांनी काढले. ‘ऊर्जा’च्या माध्यमातून खेड्यापाड्यात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रयत्नांवर टाकलेला प्रकाशझोत इतरांसाठी नक्कीच  प्रेरणादायी ठरेल, असे दापोली तालुका परीट समाज संघटनेचे अध्यक्ष सुयोग घाग यांनी सांगितले. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात वेगळी कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कार्याचा आढावा घेण्यात ऊर्जा विशेषांक यशस्वी ठरल्याचे दापोलीतील दाविक्षे प्रेस फाउंडेशनचे ॲड. संदेश मोरे यांनी सांगितले.

‘सकाळ‘ने आयोजित केलेल्या ऊर्जा प्रकाशन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. समाजातील आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाला समाजासमोर आकर्षक स्वरूपात मांडून खऱ्या अर्थाने ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘सकाळ’ने राबविलेला उपक्रम स्त्युत्य आहे. समाजातील युवकांपर्यंत हा संदेश पोचणे आवश्‍यक आहे.
- प्रा. मेहेंदळे, मार्गताम्हाने वरिष्ठ महाविद्यालय

ग्रामनिधीतून जनतेसाठी आवश्‍यक असणाऱ्या सेवा आम्ही देत आहोत; मात्र त्यामधील वेगळेपणाचे महत्त्व ‘सकाळ’ने समजून घेतले. अंजनवेल ग्रामपंचायतीसह वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या सामान्य लोकांचे आपण सत्कार केलेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
 - यशवंत बाईत, सरपंच, ग्रामपंचायत अंजनवेल

‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेला ‘ऊर्जा’ हा अंक खरोखरच अतिशय सुंदर आहे. त्यामधून समाजात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. 
- सुरेश पाटणकर, व्यवस्थापक (एच.आर.), एक्‍सेल इंडस्ट्रीज

माझ्या कामाची एवढी दखल घेतली जाईल याची मला कल्पनाच नव्हती. दैनिक ‘सकाळ’ची मी खूप आभारी आहे. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा होता. 
- सौ. सोनाली अहिरराव, गुहागर

‘सकाळ’ने आपला लौकिक जपला आहे. उदय भविष्यपत्राचा हे ब्रीदवाक्‍य खरे ठरविणारे वृत्तपत्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. समाजात ऊर्जा निर्माण करण्याचे काम केवळ ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे. 
- सौ. कंचन पवार, तनिष्का भगिनी

‘सकाळ’सोबतचा ऊर्जा अंक मिळाला. या अंकात आपल्या परिसरातील उद्योजक, शिक्षक, देवस्थाने, डॉक्‍टर, शेतकरी, पर्यटन उद्योग व्यावसायिक किती चांगल्याप्रकारे काम करतात याची तपशीलवार माहिती मिळाली. आपला अंक खूप वाचनीय झाला आहे. 
- सूर्यकांत पालांडे, अलोरे (नागावे)

‘सकाळ माध्यम समूहा’ने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजास प्रेरणा देणारे उपक्रम राबवले आहेत. तनिष्काच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ऊर्जा पुस्तिकेत कर्तबगार मान्यवरांची नोंद घेतली आहे. या पुस्तिकेतून समाजातील विविध घटकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.  
- सौ. दिशा दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्या, खेर्डी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com