हायस्पीड टेक्‍नॉलॉजीचा भारतात होणार वापर : सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

रत्नागिरी : काही मिनिटांत शेकडो किलोमीटर अंतर पार करणारी जगातील अत्याधुनिक हायस्पीड टेक्‍नॉलॉजी भारतामध्ये आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली आहेत. चीनमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या संदर्भात जगातील सर्वात मोठ्या टेक्‍नॉलॉजी प्रोव्हायडरबरोबर नवी दिल्लीत 2 सप्टेंबरला बैठक होणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.

रत्नागिरी उपकेंद्रातील रेल्वे संशोधन केंद्राच्या उद्‌घाटनाप्रसंगी श्री. प्रभू बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने नवनवीन संशोधन प्रकल्पांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून गेल्या दीडशे वर्षांतील रेल्वे जास्तीत जास्त गतिमान करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. वेगवान वाहतूक तंत्रज्ञान भारतामध्ये आणण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
 
ते म्हणाले, ""जगातील सर्वात मोठ्या टेक्‍नॉलॉजी प्रोव्हायडरला चर्चा करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निमंत्रित केले आहे. हायस्पीड टेक्‍नॉलॉजी जगात वापरली जात आहे. या तंत्राद्वारे काही मिनिटांमध्ये शेकडो किलोमीटर अंतर कापू शकतो, ते ही कमी पैशांमध्ये. जगात वापरल्या जाणाऱ्या अन्य विविध वाहतूक यंत्रणेपेक्षा ही टेक्‍नॉलॉजी पूर्णतः वेगळी आहे. यामध्ये मॅग्नेट तंत्राचा उपयोग केला आहे. जगात सर्वात प्रथम याचा वापर चीनमध्ये करण्यात आला होता. रेल्वे स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. भविष्यात आधुनिक प्रणालीचा वापर करून रेल्वेची प्रगती साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवनवीन संकल्पनांसाठी पन्नास कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. ही तंत्र वापरली गेली, तर रेल्वेचा विकास होणार आहे.‘‘ 

टेल्गोच्या चाचणीबाबत संभ्रम 

कोकण रेल्वे मार्गासह देशभरात ताशी 130 ते 160 किमी वेगाने धावणाऱ्या टेल्गोसंदर्भात श्री. प्रभू यांनी कोणतीही माहिती दिली नाही. कार्यक्रमांची गडबड असल्याने त्यांनी उत्तर दिले नाही. त्यामुळे "टेल्गो‘ची चाचणी होणार की नाही, याबाबत संभ्रमच आहे.