कुडाळचा बालेकिल्ला कायम राखू - वैभव नाईक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

कुडाळ - कुडाळात शिवसेनेचा भगवा आजही शाबूत राहिला. शिवसेना नेहमी सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देते. याची प्रचिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीवेळी आली. भविष्यात हा बालेकिल्ला कायमस्वरूपी राखू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

कुडाळ - कुडाळात शिवसेनेचा भगवा आजही शाबूत राहिला. शिवसेना नेहमी सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देते. याची प्रचिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडीवेळी आली. भविष्यात हा बालेकिल्ला कायमस्वरूपी राखू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कुडाळमध्ये किंगमेकर ठरलेल्या आमदार नाईक यांनी नवनिर्वाचित सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब यांच्यासह सर्व नूतन सदस्यांचे अभिनंदन केले. 
श्री. नाईक म्हणाले, ‘‘शिवसेना हा सर्वसामान्यांसाठीचा पक्ष आहे. कुडाळ तालुक्‍याने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. कित्येक वर्षाचा कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजही तो शाबूत आहे. 

येथील झालेली विकासकामे व जनतेशी असणारा शिवसैनिकांचा संपर्क यामुळे एक वेगळे विश्‍व निर्माण झाले. शिवसेना व मतदार ही साथ कायम राहिल्यामुळेच हा परिणाम झाला आहे. भविष्यातही जनतेची सेवा करणे, विकासकामे करणे यासाठी कटिबद्ध राहणार. पंचायत समितीमध्ये आमचे सर्व सदस्य येत्या पाच वर्षांत आदर्शवत अशी कामगिरी करतील.’’

या वेळी जिल्हा परिषद विरोधी गटनेते नागेंद्र परब, अमरसेन सावंत, जिल्हा उपप्रमुख अभय शिरसाट, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोचरे, जिल्हा महिला आघाडी जान्हवी सावंत, संजय पडते, अतुल बंगे, जीवन बांदेकर, स्नेहा दळवी, शिल्पा घुर्ये, प्रवीण सावंत, संजय भोगटे, प्रभाकर वारंग, बंटी तुळसकर, गंगाराम सडवेलकर, संदीप राऊळ, मिलिंद परब, प्रज्ञा राणे, दीपश्री नेरुरकर, रवी खानोलकर, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्‍वर, गणेश भोगटे, सचिन काळप, शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या वेळी शिवसेनेच्या दहाही सदस्यांनी भगवे फेटे परिधान करून सभागृहात प्रवेश केला.

Web Title: vaibhav naik talking