वेळासमधील घरातून वाघाचे कातडे जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मंडणगड : वेळास येथे बंद घरात ठेवलेले पट्टेरी वाघाचे कातडे चिपळूण वनविभागाने कारवाई करीत जप्त केले आहे. या प्रकरणी त्या घरातील नोकर दत्तात्रय सुडकोजी भुवड (रा. नारायणनगर, सध्या वेळास) याला अटक केली आहे. त्याला दापोली न्यायालयात तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. कातडी तस्करीचे रॅकेट आहे का याची तपासणी वनविभागाकडून सुरू आहे.

वेळास येथील श्रीमती शैलजा शशिकांत सातनाईक यांच्या मालकीचे घर आहे. सातनाईक यांच्या घरात वाघाचे कातडे असल्याची माहिती चिपळूण वनविभागाला 15 जुलै रोजी मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सातनाईक यांच्या घराच्या तपासणीसाठी वेळास येथे भेट दिली. त्यावेळी घर बंद होते. वनविभागाचे अधिकारी विकास जगताप यांनी चौकशी केली; तेव्हा घर मालक मुंबईत असल्याचे कळले. देखभाल करणारे भुवड यांच्याकडे घराची किल्ली असल्याचे कळल्यानंतर शनिवारी (ता. 16) वनाधिकारी जगताप व त्यांचे सहकारी, वेळास पोलिसपाटील, सरपंच तसेच दोन पंचांसमक्ष घराचे कुलूप उघडून पाहणी केली. तेव्हा पंख्याच्या खाली चटईवर वाघाचे कातडे सुकत ठेवलेले आढळले. घरमालक सातनाईक यांनी वीस दिवसांपूर्वी कातडे आणले असल्याची माहिती भुवड याने दिली; पण त्याने ती माहिती यंत्रणेला दिली नाही, त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत वनाधिकारी शहाजी पाटील, दापोलीचे वनपाल एम. जांभळे, वनरक्षक उदय भागवत, अमित निमकर, अनिल दळवी, एम. जी. पाटील, जी. एन. कोले, तौफिक मुल्ला, अशोक ढाकणे यांनी भाग घेतला.
 
कासवांच्या गावात वाघाचे कातडे
वेळास कासवांचे गाव म्हणून सुपरिचित आहे. येथे ऑलिव्ह रिडले कासवे मोठ्या प्रमाणात आढळतात. कासव संवर्धनामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते; परंतु या गावातून वाघाचे कातडे जप्त करण्यात आले. असे प्रथमचे घडले आहे.

Web Title: Velasa tiger skins seized from the house

टॅग्स