वेंगुर्लेत निवडणूक यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

वेंगुर्ला - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रशासकीय कर्मचारी आज केंद्राकडे रवाना झाले.

वेंगुर्ला - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रशासकीय कर्मचारी आज केंद्राकडे रवाना झाले.

जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी २१, तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. २७,३१७ पुरुष, तर २६,७०७ महिला असे एकूण ५४,०२४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज सकाळी ११ वाजेपर्यंत ९ एसटी व १२ जीपगाड्यांमधून प्रत्येक केंद्रवार मतपेट्या व मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी व पोलिस येथील तहसील कार्यलयातून रवाना झाले. तालुक्‍यातून ३ माजी सभापती, २ माजी उपसभापती, ३ माजी जिल्हा परिषद सदस्य, १ विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व एक विद्यमान पंचायत समिती सदस्य असे निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी उपसभापती सुनील म्हापणकर (शिवसेना), माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल (काँग्रेस), माजी सभापती अभिषेक चमणकर (अपक्ष), जिल्हा परिषद सदस्य सुकन्या नरसुले (शिवसेना), रमेश नार्वेकर (शिवसेना- बंडखोर), माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद परब (राष्ट्रवादी), माजी सभापती अजित सावंत (शिवसेना), तर पंचायत समिती मतदारसंघातून पंचायत समिती सदस्य प्रणाली बंगे (शिवसेना), माजी सभापती सारिका काळसेकर (काँग्रेस), माजी उपसभापती सुनील मोरजकर (शिवसेना), सिंधुदुर्ग बॅंकेचे संचालक राजन गावडे (शिवसेना) या दिग्गजांचे भवितव्य २१ ला मतदार ठरविणार आहेत.

Web Title: Vengurleta election machinery ready