अस्मिता योजनेत अनेक अडचणी

asmita-yojana
asmita-yojana

महाड : महिलांच्या आरोग्याचा विचार करुन सरकारने सॅनिटरी नॅपकीनचा वापर, प्रसार आणि वितरणाकरीता अस्मिता योजना सुरू केली, परंतु किचकट प्रक्रिया व बचत गटांनी दाखवलेला निरुत्साहामुळे या योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे. या सॅनीटरी नॅपकीनच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

महिला आणि बालकल्याण विभागाकडून शालेय मुली आणि ग्रामिण भागातील महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यासाठी 15 ऑगस्टला अस्मिता योजना सुरू झाली. मासिक पाळी दरम्यान महिलांना सॅनिटरी नॅपकीन आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. ग्रामिण भागात बाजारात मिळणारे सॅनीटरी नॅपकीन घेणे आवाक्यात नसते. यामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. हे सॅनीटरी नॅपकीन पुरवठा करण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे. यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्टया सक्षम होण्यास मदत होणार आहे. असे असले तरी आज देखील ग्रामिण भागात सॅनीटरी पॅड बाबत म्हणावी तसा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. याकरीता असणारी प्रक्रिया किचकट असल्याने बचत गट देखील हे काम करण्यास अनुत्सुक आहेत.

अस्मिता योजनेच्या वितरणाचा लाभ घेण्याकरीता बचत गट ऑनलाईन नोंद करणे आवश्यक आहे. गचत गटातील सर्व महिलांचे आधारकार्ड जोडावे लागत आहे. त्याचबरोबर या नॅपकीनची मागणी देखील आँनलाईनच करावी लागत आहे. याकरीता प्रत्येक वेळी एक ओटीपी येत असून त्यानंतरच पुढील प्रक्रीया पूर्ण केली जाते. हे सर्व करत असताना ग्रामिण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे महिलांना तालुक्याच्या ठिकाणी येउन हे काम करावे लागत आहे. ग्रामिण भागात सर्वच महिलांकडे अॅन्ड्राईड मोबाईल नाहीत. यामुळे बचत गटांनी अस्मिता योजना राबवताना निरूत्साह दाखवला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात हे नँपकिन पोहचवायचे आहेत परंतु गावात गट असुनही मागणी नसल्याने योजना वेग घेत नाही.

जिल्ह्यात ग्रामपंचायती 800
किमान 4000 बचत गट
महाड 30 बचत गटांचे ऑनलाईन नोंदणी झाली असून 18 बचत गटांना पुरवठा मंजूरी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यात पेण मध्ये 19, आलिबाग 8, पनवेल 50, उरण 30, कर्जत 28, खालापूर 30, सुधागड 31, माणगाव 35, म्हसळा 17, श्रीवर्धन 25, पोलादपूर 12, तळा 18, रोहा 29, मुरूड 18 बचत गटांना पुरवठा आदेश देण्यात आले आहेत.

तीन प्रकारात हे नॅपकीन पाऊच असून शालेय मुलींना हे सॅनीटरी नॅपकीन 5 रूपयात दिले जाते. या वितरणामागे बचत गटांना 24 रूपयांच्या पाउचमागे 6 रूपये तर 29 रूपयाच्या पाऊचमागे 6 रूपये नफा मिळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com