विक्रांत सावंत शिवसेनेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सावंतवाडी - कॉंग्रेसचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे नातू विक्रांत सावंत यांनी आज समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. 

या वेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक, अभय शिरसाट, सागर नाणोस्कर, श्री. सावंत यांच्या पत्नी सौ. सोनल सावंत आदी उपस्थित होते. 

येथील मातोश्री निवासस्थानी श्री. सावंत यांच्यासोबत भाजपचे सावंतवाडी युवा उपाध्यक्ष गुणाजी गावडे, कॉंग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आनंद तळणकर, तालुका कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष दिनेश सावंत, माजगावच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हेलन निब्रे, मनसे दोडामार्ग तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष दीपक देसाई, दोडामार्ग तालुका भाजपा सांस्कृतिक मोर्चा अध्यक्ष मदन राणे, अभिषेक सावंत, भाई निब्रे, दीपक कोटगी, प्रतीक सावंत, दीपक गावडे, तेजस गावडे, सतीश सातार्डेकर, साईप्रसाद राणे, तुकाराम तेंडोलकर, संदीप गावडे, विद्याधर सावंत, तेजस परब, गौतम मधाळे, पप्पू गावडे, रितेश सावंत, किरण सावंत, सुहास चव्हाण, ऍड. यश देसाई, राजू सुभेदार, प्रसाद मयेकर, रामकृष्ण देसाई, प्रणिता सावंत, अक्षता मडव, नमिता सावंत, भाविका सावंत, वेद सावंत, सुश्‍मिता सावंत, किरण चव्हाण, तुषार पवार, अमोल सावंत, अजिंक्‍य सावंत, प्रसाद सावंत, अनिल सावंत, प्रदीप सावंत, अशोक परब, रूपेश दळवी, दर्शन चव्हाण आदींनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पालकमंत्री केसरकर, खासदार राऊत, श्री. दुधवडकर आदींनी शिवबंधन बांधले. 

संघटना वाढीसाठी पदाचे बळ देणार 
या प्रवेशानंतर शिवसेना सचिव श्री. राऊत, श्री. केसरकर, श्री. दुधवडकर व श्री. परब आदींची मातोश्रीवर बैठक झाली. या वेळी राऊत यांनी श्री. सावंत यांची यापूर्वी पक्ष प्रमुखांशी भेट झाल्याचे केसरकर यांना सांगितले. सावंत यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पद देण्याचा प्रयत्न करू या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेच योग्य तो निर्णय घेतील असे सूतोवाच राऊत यांनी केले. हा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात होईल असे स्पष्ट केले.

Web Title: Vikrant Sawant enter in shiv sena