रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरवात

लक्ष्मण डूबे
रविवार, 27 मे 2018

रसायनीतील वासांबे मोहोपाडा आणि इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी आज रविवार ( ता 27 ) रोजी मतदान सुरू आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मतदानासाठी ठीकठिकाणी मतदान केंद्रावर नागरिकांनी रांगा लावल्याचे दिसत होते. 
 

रसायनी (रायगड) - रसायनीतील वासांबे मोहोपाडा आणि इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी आज रविवार ( ता 27 ) रोजी मतदान सुरू आहे. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मतदानासाठी ठीकठिकाणी मतदान केंद्रावर नागरिकांनी रांगा लावल्याचे दिसत होते. 

रायगड जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणा-या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप यांची आघाडी आणि विरोधात शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांची युती यांच्यात लढत आहे. एकुण 17 सदस्य असुन आघाडीचे संदीप मुंढे बिनविरोध निवडुन आले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी आणि 16 सदस्याच्या  जागासाठी आज मतदान सुरू आहे. मतदानासाठी सहा प्रभागात 22 केंद्र उभारण्यात आले आहेत असे सांगण्यात आले. 

वासांबे मोहोपाडा याशिवाय वावेघर, तुराडे, गुळसुंन्दे आणि चांभार्ली परीसरातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. तर रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्र व परीसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.  बंदोबस्त साठी अतिरिक्त सहा होमगार्डची एक तुकडी मागविण्यात आली आहे. असे पोलीस सुत्रातुन सांगण्यात आले

Web Title: vorting start in raygad district for grampanchayt election